कोकण

कोकणातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी १८ हजार रुपये नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले - चिबुड, कणगी या पिकांना भाजीपाला पिकांमध्ये समाविष्ट करून आंबा, काजू फळ पिकांप्रमाणे निकष लावण्यात येतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी १८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वेतोरे येथे दिले.

कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तालुक्‍यातील वेतोरे येथील भाजीपाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी नुकसानीसंदर्भात चर्चा केली. पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण, उपसभापती स्मिता दामले, भाजप तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेतोरे सरपंच राधिका गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, साईप्रसाद नाईक, सचिन वालावलकर, अजित राऊळ, बाळा सावंत आदी उपस्थित होते.

वेतोरे गावातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात चिबुड कणगी व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते; मात्र यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या सर्व पिकाचे नुकसान झाले. या पिकाची शासनदरबारी कोठेही नोंद नसल्याने नुकसानभरपाई मिळत नाही.

डॉ. बोंडे पुढे म्हणाले, ‘‘यावेळच्या पुराची भीषणता अधिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यानी संवेदनशील भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई वाढवून १० हजार प्रतिकुटुंब नुकसानभरपाई देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतकऱ्यांनी पतंप्रधान किसान पेन्शन योजना, गोपीनाथ मुडे विमा योजना आदींचा लाभ घ्यावा. कृषी सहायकांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसून शासनाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत पोचवाव्यात.’’
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीसीपींनी गुंडाला धो-धो धुतला! कल्याणच्या ‘सिंघम’ची धडक कारवाई; व्हिडीओ व्हायरल

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

SCROLL FOR NEXT