KOKAN SAKAL
कोकण

वृक्षतोड बंदीला शेतकरी संघटनेचा विरोध

दाद मागणार; जिल्ह्यात ९९.९८ टक्के खासगी क्षेत्र, शासकीय परवानगीनेच कृती

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : जल, वन, जमीन या संपत्तीवर शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांचा हक्क आहे. या संपत्तीवर कोणीही गदा आणण्याचा प्रयत्न करू नये. कोणी असा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकरी शासनदरबारी दाद मागू, असा इशारा रत्नागिरी जिल्हा शेतकरी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला असून वृक्षतोड बंदी झाली तर ग्रामीण भागातील शेतकऱ्याला राहते घर, परडे सोडल्यास कोणतीही जमीन शेतकऱ्याच्या हातात राहणार नाही, असा दावा केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पूर्ण जमिनीला वनसंज्ञा लागू होईल व त्यांची नियमावली लागू होईल. जल, जंगल, जमीन यावरती शासनाच्या नियमावलीप्रमाणे शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्याच्यावर कोणीही गदा आणणेचा प्रयत्न करू नये तसेच करण्याचा प्रयत्न केल्यास शासन दरबारी आम्ही दाद मागू.

काही वर्षांपूर्वी माजी वनमंत्री स्व. पतंगराव कदम यांच्यापर्यंत काहींनी वृक्षतोडीसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. यानुसार वृक्षतोडबंदीची घोषणादेखील करण्यात आली; मात्र शेतकऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. जंगल हे शेती म्हणून शासनाने रीतसर जाहीर केले आहे व त्यावरील बाहेरगावी किटा, जळण, इमारती लाकूड बाहेर जाते. त्यावेळेच त्यांच्याकडून रीतसर कर घेतला जातो व कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीकडून कर घेतला जातो, याकडे पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पालांडे, संजय थरवळ, अनंत पवार, महेश शिंदे आदींनी शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT