Fasting held in kervde Gram Panchayat konkan sindhudurg 
कोकण

उपोषणास्त्र लई भारी... ग्रामपंचायतीतच थाटला चक्क संसार

अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - "कुणी घर देता का हो घर', म्हणत केरवडे तर्फ माणगाव येथील राघोजी घाडी यांनी न्याय मिळेपर्यंत तुटपुंजा संसार घेऊन उपोषणाचा आधार घेत वृद्ध आईसोबत केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायतीच्या वरांड्यात एक दिवसाचा संसार थाटला. सरपंच यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे त्यांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले. 

एप्रिलमध्ये शेजारी विहीर खोदाई करताना ब्लास्टींग केल्याने राघोजी घाडी यांच्या राहत्या घराच्या भिंतींना पूर्णतः तडे गेले होते. याची लेखी तक्रार एप्रिलमध्ये ग्रामपंचायत केरवडे तर्फ माणगाव, तहसीलदार कुडाळ यांच्याकडे केली होती. संबंधित यंत्रणेने पंचनामा करून वस्तुस्थिती खरी असल्याचा आव आणून मदत मिळवून देवू असे सांगितले; मात्र आज तीन महिने उलटले तरी कोणतीही मदत मिळाली नाही.

आज वृद्ध आईसोबत गळक्‍या व कधीही जमीनदोस्त होवू पाहण्याऱ्या घरात जीव मुठीत धरून राघोजी घाडी राहत होते. अखेर असह्य झाल्याने कुणी घर देता काहो घर म्हणत राघोजी घाडी यांनी न्याय मिळेपर्यंत तुटपुंजा संसार घेऊन उपोषणाचा आधार घेत आपल्या वृद्ध आईसोबत ग्रामपंचायतीच्या वरांड्यातच संसार थाटला. शेवटी सरपंच अंजली जाधव यांनी येत्या आठ दिवसांत तहसील कुडाळकडून मदत मिळवून देवू न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असे लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT