Father Day Special story in ratnagiri 
कोकण

फादर्स डे स्पेशल : अशक्य ते शक्य करुन दाखवले या बापाने अन ती कर्णबधिर झाली पशुवैद्यक अधिकारी ......

शिरीष दामले

रत्नागिरी : आपली मुलगी निवेदिता ही बहुतांशी बहिरत्व असलेली आहे हे कळले, त्या वेळी ती अडीच वर्षांची होती. मला त्या वेळी भोवळच आली. मूल कोणत्याही पद्धतीने दिव्यांग निघाल्यावर सर्व पालकांची अवस्था हीच होते; पण त्यानंतर सावरून ठाम निर्धार करून उभे राहिलो. जे शक्‍य होते तेच नव्हे तर अशक्‍यही वाटावे, ते सर्व मी मुलीसाठी केले. हे सुधीर बर्वे यांचे म्हणणे लेकीने सार्थ केले आहे. 


बहिरत्व असलेली त्यांची कन्या पुढे पशुवैद्यक झाली. भटक्‍या कुत्र्यांना व जनावरांना उपचार देईन, असा पण तिने आठव्या वर्षी केला. तो निभावण्यासाठी तिला सर्वतोपरी पाठिंबा देताना सुधीर बर्वे "बापमाणूस' म्हणून उभे राहिले. निवेदिताला बहिरत्व असल्याचे लक्षात आल्यावर वडील म्हणून काय ठरवले? यावर बर्वे म्हणाले, आम्ही आमच्या मुलीला पूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रपणे उभी करण्याचे, तसेच एक जबाबदार नागरिक बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. त्यामध्ये पत्नी सुप्रिया हिची मोठी साथ लाभली. मातृभाषा मराठी नाही, हिंदी सभोवतालची भाषा, इंग्रजी शिक्षणाची भाषा आणि मुंबई व चिपळूणसारख्या प्रदेशात आल्यावर मराठी आवश्‍यक असा निवेदिताबरोबर तिच्या कुटुंबीयांचा बहुभाषिक प्रवास झाला.

त्यामुळे 2005 च्या पुरात मुंबईत 24 तास अडकून, ऐकण्याची सर्व साधने हरवलेली असताना ती धीराने परत आल्यावर दूर असलेले तिचे कॉलेज बदलायचे नाही, या तिच्या निर्णयामागे, राजस्थानातील पूर्ण अपरिचित प्रांतात भटक्‍या जनावरांची सेवा करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत जाण्याचा निवेदिताचा निर्णय, तेथील काम सोडून चिपळूणसारख्या मराठी भाषिक, तुलनेने खेडवळ भागात नोकरशाहीत सामील होण्यासाठी ती आली. आजचे तिचे कर्तृत्व बघता मी बाप म्हणून मुलीमुळे योग्य ठरलो, असे बर्वे म्हणाले. 

हेही वाचा- डिक्की, बाटू या संस्थांनी कोकणातील कुठले गाव घेतले दत्तक.......वाचा


यशस्वी नात्याचे गमक 
निवेदिता कर्णबधिर होती खरी; परंतु अत्यंत संवेदनशील. त्यामुळे तिला आम्ही कधी रागावलो नाही किंवा मारले नाही. याचबरोबर तिच्या कर्णबधिरत्वाबद्दल आम्ही कधीही अनावश्‍यक चर्चा केली नाही. बाह्य जगाशी संपर्कासाठी आमची गरज उरली नाही. तोपर्यंत आम्ही तिचे पहिल्या निवडीचे मित्र बनलो होतो. हे बापलेकीच्या यशस्वी नात्याचे गमक आहे, असे बर्वे यांनी नमूद केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT