felled tree is preserved in the form of wood carvings 
कोकण

नाइलाजाने तोडलेले झाड काष्ठशिल्पाच्या रूपात जतन

अमित पंडित

साखरपा : अनेक वेळा काही झाडे नाइलाजाने तोडावी लागतात. पण असे तोडलेल्या झाडापासून काष्ठशिल्प तयार करून ते झाड जतन करण्याची कला साधली आहे ती दिलीप म्हैसकर या अवलिया कलाकाराने. 

दिलीप म्हैसकर हे मूळचे संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावाचे रहिवासी. तिथे त्यांनी आपल्या घरातच काष्ठशिल्प संग्रहालय तयार केले आहे. गेली ४० वर्षे ते ही कला जोपासत आहेत. त्यांच्या घराजवळ असलेले नारळाचे झाड त्यांना नुकतेच नाइलाजाने तोडावे लागले. घरावर आल्याने हे झाड धोकादायक ठरत होते. त्यामुळे म्हैसकर यांनी ते झाड तोडले. पण तोडलेल्या झाडापासून काय करता येईल याच्या विचारातून एका काष्ठशिल्पाचा जन्म झाला. नाइलाजाने तोडलेले झाड वाया जावू न देता त्यापासून कायमस्वरूपी टिकावू काहीतरी करता येईल का या प्रश्नातून शिल्पाचा जन्म झाला आहे. जुन्या काळातील महाकाय प्राण्याच्या धर्तीवर हे शिल्प म्हैसकर यांनी तयार केले आहे. नारळाच्या खोडापासून चार पाय आणि प्राण्याचे धड तयार केले आहे तर झाडाच्या पोयीपासून कान तयार केले आहेत. तसेच एका जंगली झाडापासून प्राण्याचे तोंड तयार केले आहे. हे शिल्प टिकावे ह्यासाठी म्हैसकर यांनी वूड पॉलिश आणि बुरशी रोधक औषधांचा वापर करून शिल्पाला रंग दिला आहे. 

साधारण सात फुट उंच आणि तितकेच लांब असे हे शिल्प म्हैसकर यांनी घराच्या प्रवेशासमोर ठेवले असून प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

हजारो वर्षांपूर्वी अस्तीत्वात असलेल्या महाकाय प्राण्यांची कल्पना डोळ्यासमोर ठेऊन ही काष्ठशिल्प तयार केले आहे. ज्यूरासिक पार्कसारख्या चित्रपटांमध्ये असे प्राणी संगणकीय कलेने पाहावयास मिळतात. असाच एखादा प्राणी करावी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. 

- दिलीप म्हैसकर, काष्ठशिल्पा कलाकार 


संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने जळगाव हादरले

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Asia Cup 2025: संजू सॅमसन संघात असेल, पण सलामीवीर म्हणून नाही! सुनील गावस्करांनी निवडली टीम इंडियाची Playing XI

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुसळधार पावसामुळे अकरावी प्रवेशाची मुदत २२ ऑगस्टपर्यंत वाढवली!

Parbhani News : दुधना नदीत दोन दुचाकीस्वार वाहून, ग्रामस्थांची पुलाच्या उंचीवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT