festival Gambling issue konkan sindhudurg 
कोकण

जत्रोत्सवातील "रात्रीस खेळ' जोरात 

निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात जत्रोत्सवात जुगार सुरू नसल्याचा कितीही दावा केला असला तरीही सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील गावात जत्रोत्सवात खुलेआम जुगार सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. राजरोस सुरू असलेल्या या जत्रोत्सवातील जुगाराची छायाचित्रेही आता पुढे आल्याने "रात्रीच्या खेळावर' शिक्कामोर्तब झाले आहे. अवैध धंद्यांना जिल्ह्यात थारा देणार नसल्याचे वक्तव्य करणारे जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे जत्रोत्सवातील जुगारावर काय कारवाई करतात? याकडे आता लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यात जवळपास चार महिने जत्रोत्सवाचा हंगाम असतो. या कालावधीत पूर्वी सऱ्हास जुगार चालायचा. जत्रोत्सवाच्या ठिकाणापासून काही अंतरावर मांडल्या जाणाऱ्या या जुगारामध्ये एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल होत असे. तत्कालीन पोलिस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी हा जुगाराचा प्रकार पूर्णतः बंद केला होता. त्यानंतर आलेल्या जवळपास सर्वच पोलिस अधीक्षकांच्या कारकिर्दीत जत्रोत्सवातील जुगार बंद होता; मात्र छुप्या पद्धतीने जुगार सुरू होता. आजही पोलिस जत्रेत जुगार नसल्याचा दावा करत आहेत; मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. काही जत्रोत्सवांमध्ये खुलेआम जुगार चालतो. विशेषतः सीमावर्ती भागात याचे प्रमाण जास्त आहे. 

गोव्यातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात या जुगारात सहभागी होत आहेत. यासाठी दुर्गम भागात वसलेल्या गावांमधील जत्रोत्सवात जुगार अधिक प्रमाणात मांडला जातो. गेल्यावर्षी देखील जत्रोत्सवात मोठ्या प्रमाणात जुगार मांडण्यात आला होता. याबाबतची छायाचित्रेही "सकाळ'ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले होते. यावर्षी पुन्हा बांदा दशक्रोशीत जुगार खुलेआम सुरू आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे नियम पाळून जत्रोत्सव सुरू आहेत. असे असूनही जुगार मात्र थांबलेले नाहीत. 

जंगलातील दुर्गम ठिकाण 
बांदा दशक्रोशीतील दुर्गम गावातील जंगलात हे "रात्रीचे खेळ' सुरू आहेत. यासाठी गोव्याबरोबरच जिल्ह्यातील जुगार व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. जुगार कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी जत्रोत्सवापासून लांब जंगलात दुर्गम ठिकाण निश्‍चित करण्यात येते. जुगार कोठे होणार आहे? याची सविस्तर माहिती व्यवसायिकांपर्यंत पोहचविण्यात येते. त्यामुळे चोरट्या पद्धतीने हे व्यावसायिक एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. 

पोलिस सुशेगाद 
बांदा दशक्रोशीतील प्रत्येक गावातील जत्रोत्सवात जुगार खुलेआम सुरू आहे. ज्या गावात जत्रोत्सव असतो त्या रात्री 12 वाजता स्थानिक पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करून जाते. पोलिसांची गाडी गेली, की जुगार व्यावसायिक जुगार मांडण्यास सुरुवात करतात. बाहेरून खेळण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांना शेवटच्या क्षणापर्यंत जागेची माहिती देण्यात येत नाही. येथे देत असलेल्या छायाचित्रातील जुगार हे जत्रोत्सवापासून 1 किलोमीटर अंतरावर जंगलात ठेवण्यात आले होते. कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी रस्त्यावर व जत्रेत ठिकठिकाणी व्यावसायिकांनी आपली माणसे तैनात ठेवली होती. हीच माणसे खेळण्यासाठी आलेल्यांना जुगारापर्यंत नेण्याची कामे करत होती. याठिकाणी खेळण्यासाठी आलेल्यांना मद्याची सोयही होती. पोलिस सुशेगाद असल्यानेच व्यावसायिकांचे फावले आहे. 

जत्रोत्सवातील जुगाराबाबत पोलिसांना सक्‍त सुचना केल्या आहेत. कोणी चोरट्या मार्गाने असे प्रकार करत असल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. अशा प्रकारांची माहिती देण्यास जागृत नागरिकांनी पुढे यावे. त्यांची नावे गुपित ठेवू. 
- रोहिणी सोळंखे, पोलिस उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT