the festival of sollai goddess in devrukh ratnagiri cancelled for this year in devrukh 
कोकण

कोकण : दोनशे वर्षे परंपरेची सोळजाई देवीची यात्रा यंदा रद्द

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असलेली देवरुख सोळजाई देवीची देवदिवाळीची होणारी लोटांगण यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत अध्यक्ष बापु गांधी यांनी ही माहीती दिली.

देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवस्थानची लोटांगण यात्रा प्रसिद्ध आहे. नवस बोललेले भाविक नवस पुर्ण करण्यासाठी देवी समोर लोटांगण घालतात. मंदिरभोवती पाच फेर्‍या पुर्ण करुन लोटांगणे घातली जातात. यावेळी प्रमुख शहरातील नागरीक उपस्थित रहातात. यावेळी जत्रेचे स्वरुप येते व मोठी यात्रा भरते. यावर्षी १५ डिसेंबरला होणारी ही लोटांगण यात्रा रद्द करण्यात आली आहे.


दोनशे वर्षाच्या परंपरेत वादळ, पाऊस असुनही यात्रेत खंड पडला नव्हता. यंदा कोरोनामुळे ही प्रथा बंद पडली आहे. धार्मिक विधी होवून लांबूनच देवीचे दर्शन घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. बाहेर कुठलीही दुकाने लागणार नाहीत. भाविकांनी शक्यतो गर्दी करु नये असे आवाहन गांधी यांनी केले आहे.
सोळजाई देवी ही ४४ खेडी व १६ गावांची मालकीण असल्याचे मानले जाते. आंबा, प्रभानवल्ली, उक्षी, गोठणे, सावर्डे असा परीसर देवीच्या अखत्यारीत येतो. नवसाला पावणारी देवी म्हणून सोळजाईची या परिसरात प्रसिद्ध आहे. पत्रकार परिषदेला देवस्थानचे अध्यक्ष बापु गांधी, संतोष लाड, रविंद्र गीते, प्रकाश शिंदे, उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, पकोडे आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाने 62 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT