Fifteen Hundred Metric Tons Of Fertilizer Delivered To Ratnagiri  
कोकण

काही सुखद ! पंधराशे मेट्रिक टन खत रत्नागिरीत दाखल 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मजूर उपलब्ध झाल्यामुळे अलिबाग तुर्भे येथून 1500 मेट्रिक टन खत मालगाडीतून रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाले आहे. त्यामुळे गेले काही दिवस निर्माण झालेल्या खताच्या टंचाईवर मात करणे शक्‍य असून येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांना दुकानात खत उपलब्ध होणार आहे. 

खरीपसाठी जिल्ह्यासाठी 20 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली होती. त्यांपैकी चार हजार मे. टन खत प्राप्त झाले होते. मजूर उपलब्ध नसल्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झालेले खत उतरवण्यात अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे पहिल्या तीन गाड्या सोडल्यानंतर आरसीएफकडून खताची गाडीच पाठविण्यात आलेली नव्हती. परिणामी जिल्ह्यात शेतकऱ्यांना खतच मिळत नव्हते.

कोकणात सर्वाधिक भातशेतीला युरिया खत वापरले जाते. पेरण्यांची सुमारे साठ टक्के कामे पूर्ण झाली असून आता खऱ्या अर्थाने खताची मात्रा देणे आवश्‍यक आहे. खत मिळाले नाही तर रोपांची व्यवस्थित वाढ होणे अशक्‍य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तगमग सुरू झाली आहे. या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे. कृषी विभागानेही मजूर उपलब्ध करून रत्नागिरीत खत उतरवण्यासाठी पावले उचलली आहेत. सध्या शंभर मजुरांची नोंदणी झालेली आहे. 

भात लागवडीबरोबरच फळबाग लागवडीची कामे सध्या सुरू आहेत. त्यासाठी खतांची आवश्‍यकता भासत असताना खताअभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. सोमवारी सकाळी मालगाडीतून खत आले असून ते गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. पंधराशे टनांत युरिया 800 मेट्रिक टन, तर सुफला सातशे मेट्रिक टन आहे. जिल्हाभरातील शासनमान्य खत विक्रेते आणि विविध कार्यकारी सोसायटींना खत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खताची मागणी घेण्यात आली असून ते बांधावर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

जिल्ह्यासाठी आवश्‍यक खत प्राप्त झाले आहे. दुसरी गाडी दोन दिवसांत रत्नागिरीत दाखल होईल. त्यामुळे खताचा तुटवडा भासणार नाही. 
- विनोद शेंड्ये, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT