कोकण

पोस्टाचा 755 रुपयांत पंधरा लाखाचा अपघाती विमा

CD

१४ (टूडे ३ साठी, अँकर)

पोस्टाचा ७५५ रुपयांत १५ लाखांचा विमा

एन. टी. कुरळपकर ः १८ ते ६५ वयोगटासाठी योजना

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार या व्यतिरिक्त विविध योजना व ७५५ रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान आहे ते पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती विभाग डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी दिली.
पोस्ट कार्यालयाने निवाबूपा या नामांकित आरोग्य विमा इन्शुरन्स कंपनीसोबत ही नवी योजना सुरू केली आहे. अपघाती विमा पॉलिसी अपघाती विम्यात पॉलिसी धारकाचा मृत्यू कायमस्वरूपी तात्पुरता किंवा अंशतः अपंगत्वाच्या जोखीमेपासून संरक्षण मिळते. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर वारसाला विम्याची रक्कम मिळते. अपघातातील अपंगत्व किती टक्के आहे, यावर विम्याची रक्कम अवलंबून आहे. या पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे आवश्यक आहे. ग्राहक नुकसानभरपाई व्यतिरिक्त त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये आणि विवाहित मुला-मुलींना एक लाख रुपये दिले जातील. अपघातात पॉलिसीधारकाचे हाड तुटल्यास उपचारासाठी २५ हजार रुपये देण्याची सुविधा आहे. पॉलिसीमध्ये मातृत्वाची सुविधाही देण्यात आली आहे. विमा पॉलिसीमुळे संकट काळात तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला किंवा पोस्टमनला भेटून ही पॉलिसी घेऊ शकता. योजनेचा जास्तीस जास्त लाभ घेऊन आपले व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहनही कुरळपकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT