देवगड : आपला विरोधक एक असल्याने आपापसात लढण्यापेक्षा एकत्र लढल्यास महाविकास आघाडीची ताकद मजबूत होईल. येथील जनतेने नगरपंचायतीमध्ये परिवर्तनाची संधी दिल्यास विकासाची गंगा आणू, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील नागरिकांना दिला. श्री क्षेत्र कुणकेश्वर स्थानिक विकासासाठी निधी दिल्याने कुणकेश्वराचा आशिर्वाद आम्हालाच मिळणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये शिवेसना, राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. सामंत बोलत होते. मंचावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, रवींद्र जोगल यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, श्री क्षेत्र कुणकेश्वराचा पर्यटनात्मक विकास साधण्यासाठी निधी दिला आहे. त्याचप्रकारे देवगड जामसंडे शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. नगरपंचायतीमधील सत्तेत परिवर्तन झाल्यास एकही विकासात्मक काम मागे ठेवणार नाही.
शहराचा विकास कसा करायचा, त्याचे वेगळेपण काय असेल याची माहिती उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोचवली पाहिजे. सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नगरपंचायतीमध्ये सर्वांचा विरोधक एकच असल्याने एकत्र लढल्यास महाविकास आघाडी घट्ट होईल. नगरपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकवला पाहिजे. निवडणूकीत प्रचाराची मोठी सभा घेतली जाईल. जनतेचा विश्वास असल्याने महाविकास आघाडी निश्चित परिवर्तन करेल.
"ही विकासाची निवडणूक आहे. निवडणूकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीची आघाडी असून कार्यकर्त्यांनी शांतपणे निवडणूक प्रचार करावा. मतदारांचा विश्वास जिंकून नगरपंचायतीमध्ये परिवर्तन करणे अवघड नाही. आजवर केलेल्या कामाची मतदार नक्कीच पोचपावती देतील."
- नंदकुमार घाटे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी देवगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.