Fighting two families Seven people injured kankvali crime news 
कोकण

कोकणात राडा : दोन कुटुंबांत हाणामारी; सात जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) :  फोंडाघाट येथे जमीन वहिवाटीवरून पारकर आणि कातरूड अशा दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांतील सात जण जखमी झाले असून यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ही मारहाण काल सायंकाळी चारच्या सुमारास फोंडाघाट बावीचे भाटले येथे कातरूड यांच्या घरात घडली. 

मारहाणीत दांडा डोक्‍यावर मारल्याने दोघे जण गंभीर आहेत. दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दोघा जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दोघांना कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते; मात्र याबाबत अद्याप पोलिसांत फिर्याद दाखल झालेली नाही. यातील जखमी कातरूड पोलिस ठाण्यात आले होते; मात्र उपचार करून झाल्यावर फिर्याद दाखल केली जाईल, असे पोलिस ठाणे अंमलदार ममता जाधव यांनी त्यांना सांगितले. 

जमीन वादातून फोंडाघाटमध्ये हाणामारी 

फोंडाघाट बावीचे भाटले येथे पाटकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीचा वाद आहे. हा वाद सध्या न्यायालयात आहे. या जमिनीवरून यापूर्वीही वाद झाले होते. या वादातून सायंकाळी कातरुड राहत असलेल्या बावीचे भाटले येथील घरात दोन्ही कुटुंबांतील काही जणांमध्ये वाद झाला. त्यात दोन्ही कुटुंबात लाकडी दांडा व काठ्यांच्या साहाय्याने मारामारी झाली. त्यात सात जण जखमी झाले होते. त्यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेत वाद मिटवला आणि जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यात गणेश मधुकर पारकर (47), ताराचंद्र मोहन पारकर (49) अनिल पारकर, एकनाथ धोंडू कातरुड, त्यांची पत्नी शुभांगी, मुलगा प्रशांत (सर्व रा. बावीचे भाटले) जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कणकवली पोलिस तपास करीत आहेत. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT