fire accident Blast in dairy Neral short circuit Shutters blown 10 feet  sakal
कोकण

Fire Accident : नेरळमधील डेअरीत शॉर्टसर्किटमुळे स्फोट; शटर १० फूट उडाले;लाखोंचे नुकसान

दुकानातील सामानासह डेअरीचे शटर जवळपास १० फुटांपर्यंत उडाले.

सकाळ वृत्तसेवा

नेरळ : नेरळ बाजारपेठातील वरचा भाग असलेल्या टेपआळी येथील एका डेअरीच्या दुकानात रविवारी पहाटे स्फोट झाला. त्यामुळे दुकानातील सामानासह डेअरीचे शटर जवळपास १० फुटांपर्यंत उडाले.

अपघातात जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले. स्‍फोटाची माहिती मिळताच नेरळ ग्रामपंचायतीतील आपत्कालीन व्यवस्था पाहणारे मंगेश इरमाले यांच्यासह नेरळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा स्‍फोट शॉर्टसर्किटमुळे झाल्‍याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नेरळ बाजारपेठातील माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्गावर अनेक छोटीमोठी दुकाने आहेत. टेपआळी परिसरात अंबरनाथ जय हिंद बँकेजवळ श्री भैरवनाथ डेअरी आहे. डेअरीचे मालक कैलास डांगी शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले.

रविवारी पहाटे डेअरीत स्फोट होऊन सामानासह शटर उडाले. ही घटना अंबरनाथ जय हिंद बँकेच्या एटीएममधील सुरक्षारक्षकाने पाहिली. त्यामुळे त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी व आपत्कालीन विभागातील मंगेश इरमाले यांना माहिती दिली.

त्‍यानंतर डेअरीचे मालक, नेरळ पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत रस्त्यावर पसरलेले सामान बाजूला केले. शॉर्टसर्किटमुळे दुकानात गॅस निर्माण झाल्‍याने स्‍फोट झाल्‍याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त होत आहे.

डेअरी मालकाला धक्‍का

नेरळमध्ये नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. रविवार त्यात संततधारेमुळे रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती त्यामुळे स्फोटात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले. डेअरीचे मालक कैलास डांगी यांच्यावर नुकतीच एक मोठी शस्‍त्रक्रिया करण्यात आली आहे. डेअरी उद्ध्वस्‍त झाल्‍याने त्‍यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT