fire in godown of scrap in lanja ratnagiri rupees 5 lakh damages 
कोकण

भंगारच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत पाच लाखाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी) : भंगार टायर आणि पुठ्ठ्यांच्या गोडाऊनला  दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. लांजा कुक्‍कुटपालन येथे आकाशात प्रचंड धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अडीचच्या सुमारास आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोडाऊन मालक विजयकुमार बेन यांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

उत्तर प्रदेश येथील रहिवासी असणारे विजयकुमार बेन हे पत्नी आणि मुलांसह गेल्या ३५ वर्षांपासून लांजा येथे वास्तव्यास आहेत. लांजा कुक्‍कुटपालन या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गालगत त्यांचे पुठ्ठा आणि भंगार टायरचे गोडाऊन आहे. या ठिकाणी त्यांनी विक्रीच्या उद्देशाने टायर व पुठ्ठा ठेवला होता. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक या भंगार गोडाऊनला आग लागली.

सुरवातीला १ ते २ टायरने पेट घेतला आणि त्यानंतर क्षणार्धात आग भडकली. काही कळायच्या आतच भंगार टायर आणि पठ्ठ्यांनीही पेट घेतल्याने आग भडकली. आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट आकाशाला भिडले. दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात नागरिकांना यश आले; मात्र या घटनेत विजयकुमार बेन यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान 
झाले आहे.

घटनास्थळी धाव 

कुक्कुटपालन येथे भंगार टायर गोडाऊनला आग लागल्याचे कळताच लांजातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगराध्यक्ष मनोहर बाईत, पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी पाण्याचा टॅंकर बोलवण्यात आला. त्यानंतर नगरसेवक स्वरूप गुरव, मंगेश लांजेकर, राजू हळदणकर, राजू इंगळे, राजू जाधव, मंदार गांगण, प्रसाद भाईशेटे, सचिन लिंगायत, बाबा लांजेकर आदी ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मदत केली.


एक नजर..

  •   दुपारी एकच्या सुमारास आग
  •   सुरवातीला १ ते २ टायरने घेतला पेट 
  •   नागरिकांनी घेतली घटनास्थळी धाव 
  •   पाण्याचा टॅंकर मागवला, पोलिस घटनास्थळी
  •  दीड तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT