fire on pistol youth death case in sindhudurg incidence nerur dukanwad
fire on pistol youth death case in sindhudurg incidence nerur dukanwad 
कोकण

बंदूक घेऊन जंगलात गेला शिकारीला आणि स्वतःचीच झाली शिकार

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : बिगरपरवाना बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने घराशेजारील जंगलात गेलेल्या युवराज वारंग (वय १८) याचा बंदुकीची गोळी लागून जागीच मृत्यू झाला, अशी माहिती येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. ही घटना हळदीचे नेरूर दुकानवाड येथे आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली.


श्री. कोरे यांनी सांगितले की, दुपारी युवराज घराशेजारील जंगलात बिगरपरवाना बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने गेला होता. काही वेळाने मोठ्याने बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला म्हणून घरातील धावत गेले असता युवराज जमिनीवर पडलेल्या स्थितीत होता. बाजूला बंदूक पडलेली होती. जवळून पाहिले असता युवराजच्या छातीत सिंगल बार बंदुकीची गोळी लागल्याचे दिसून आले व त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्या काकाने दिली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. युवराज एकटाच गेला होता की, त्याच्या सोबत अन्य कोण गेले होते, याचाही तपास केला जाणार असल्याची माहिती निरीक्षक कोरे यांनी दिली.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT