कोकण

कोकण रेल्वे मार्गावरून विस्टा डॅमचा शुभारंभ

राजेश कळंबटे/

रत्नागिरी : आरामदायी प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्माण केलेली कोकण रेल्वेची विस्टाडॅम रेल्वे (vista dam railway)आज पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावरून धावली.खरतर कोकण रेल्वे ज्या मार्गावरून धावते त्या मार्गावरील निसर्ग सौंदय प्रत्येकाला भुरळ पाडते. आजूबाजूला डोळे सुखावणारी हिरवाई, नीळ आकाश, डोंगर माथे आणि पावसाळ्यात ओसंडणारे धबधबे स्वर्गीय अनुभव देतात आणि प्रवास सुखकर होतो. मात्र नेहमीच्या रेल्वेच्या गाडीतून हा अनुभव पूर्णपणे मिळतोच असे नाही.first-journey-of-vista-dam-railway-place-today-run-in-Konkan-railway-ratnagiri

प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने विस्टा डॅम ही वेगळी रेल्वे तयार केली आहे. या स्पेशल बोगीला प्रशस्त काचा बसवण्यात आल्यात, यामुळे ट्रेनच्या खुर्चीत बसून एक वाईड व्ह्यू अनुभवता येतो. मोठमोठ्या खिडक्या बरोबरच बोगीत प्रशस्थ जागा आहे. यातील खुर्च्या मागे पुढे होतातच पण गोल ही फिरतात यामुळे प्रवासी आपल्याला हव्या तशा खुर्च्या ऍडजस्ट करू शकता.यास्पेशल बोगीत फ्रीज, डीप फ्रीज बरोबरच ओव्हन व अन्य सुविधा आहेत .

सर्व सोयी सुविधां असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच विस्टा डॅम रेल्वे चा पहिला प्रवास आज कोकण रेल्वे मार्गावरून झाला. या बोगीचे छप्पर ही काचेचे असून बोगी च्या मागील बाजूचे दालन विशेष आहे.यात उभे राहून मोठ्या काचेतून आपण कोकणचा निसर्ग अनुभवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT