first president Ram Nath Kovind visit Ambadve hometown of Dr. Babasaheb Ambedkar  sakal
कोकण

घटनाकारांच्या मूळ गावी आंबडवेला भेट देणारे पहिलेच राष्ट्रपती ठरणार...

राष्ट्रपती पहिल्यांदाच आंबडवेत..!

सचिन माळी.

मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान सभेने देशासाठी एक संपूर्ण नवीन संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधान स्वीकारले गेले व २६ जानेवारी १९५० ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद ठरले. आतापर्यंत देशाला १४ राष्ट्रपती लाभले. रामनाथ कोविंद हे १४ वे राष्ट्रपती असून, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळगावी येणारे ते पहिले राष्ट्रपती ठरणार आहेत.

बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सैनिक शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा रामजी म्हणजे बाबासाहेबांचे वडील भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते व त्यांचे आंबडवे येथे जाणे-येणे असे. रामजी व भीमाबाई यांचा सर्वांत लहान पुत्र भीमराव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. बाळ भिवा ६ वर्षांचा असताना आई भीमाबाई यांचे निधन झाले. आंबेडकरांची आत्या मीराबाई मालोजी सकपाळ या दिव्यांग होत्या व माहेरी राहत होत्या. बाळ भिवाचा त्यांनी सांभाळ केला. जिजाबाई सकपाळ या सावत्र आई होत्या. लहानपणी बाबासाहेब वडिलांसोबत मूळगाव आंबडवे येथे येत असत. आंबडवेशी घट्ट नाते असणारे अनेक प्रसंग येथील नातेवाईक सांगतात.

स्मारकासाठी दोन घटनांची प्रेरणा...

डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीवर प्रबंध लिहिणारी एलियार झेलियट या अमेरिकन विद्यार्थिनीने ९ फेब्रुवारी १९६५ साली मूळ वंशाचा शोध लावत आंबडवे गावी भेट दिली. थोर माणसाच्या घराची दूरवस्था पाहून खेद व्यक्त करत रत्नागिरी जिल्हा कार्यालयात अभिप्राय नोंद केला. तत्कालीन जिल्हाधिकारी जे. डी. जाधव यांनी २८ फेब्रुवारी व १४ एप्रिल १९६७ ला आंबडवे गावाला भेट दिली. या दोन घटनांची प्रेरणा घेऊन स्मारकासंबंधी विचार सुरू झाले होते.

पंचतीर्थ असणारे आंबडवे अजूनही उपेक्षित

केंद्र सरकारने भारतरत्न बाबासाहेबांशी संबंधित असणाऱ्या ऐतिहासिक स्थळांचा पंचतीर्थ म्हणून विकास करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये त्यांचे मूळगाव आंबडवे, जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवासस्थान आणि दिल्लीतील २६ अलिपूर रोड यांचा समावेश आहे. खासदार अमर साबळे यांनी संसद आदर्श ग्रामयोजनेअंतर्गत आंबडवे दत्तक घेतले. त्यासाठी सुमारे ३५५ कोटींचा विकास आराखडा बनवण्यात आला होता. यामध्ये गावाचे तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ असा विकास करण्याबरोबरच ग्रामस्थांचे राहणीमान उंचावण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसह सामाजिक- सांस्कृतिक असा सर्वांगीण प्रगतीचा विकास आणि जगाला हेवा वाटेल, असे बाबासाहेबांचे शिल्प सृष्टी, स्मारक, यात्री निवास या महत्त्वपूर्ण बाबींचा आराखड्यात समावेश करण्यात आला होता; मात्र यावर कृतिशील काहीच न झाल्याने आजही मूळगाव उपेक्षित राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT