The first runner Kranti Mhaskar in the state to practice in the field 
कोकण

शेतात सराव करणारी धावपटू राज्यात प्रथम 

सकाळवृत्तसेवा

मंडणगड ( रत्नागिरी) - डेरवण युथ गेम या राज्यस्तरीय स्पर्धेत मंडणगड तालुक्‍यातील नारगोली गावच्या कुमारी क्रांती मिलिंद म्हसकर हिने 18 वर्षाखालील वयोगटात लांब उडी व शंभर मीटर धावणे या दोन क्रीडा प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. मोकळ्या झालेल्या शेतात तिने सराव केला. सराव करण्यासाठी सुसज्ज मैदान नाही, क्रीडा संकुल नाही अशा प्रतिकुलतेवर तिने मात केली आहे. 

डेरवण येथे 24 ते 31 मार्च 2021 या कालावधीत झालेल्या स्पर्धेत विजेती होण्याचा मानही तिने मिळवला आहे. मंडणगड तालुक्‍यातील नवी दिशा स्पोर्टस अँकडॅंमीच्या एकूण तेरा खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्तम कामगिरी केली. यात मंडणगड एक्‍सप्रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीने दोन क्रीडा प्रकारात अतिशय उत्तम कामगिरी बजावली. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मैदानात उतरत यश संपादन केले.

राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून मंडणगड तालुक्‍यासह रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकीक वाढविला आहे. तिच्या या यशाबद्दल क्रांती व तिचे प्रशिक्षक प्रविण भुवड यांचे तालुक्‍यातील विविध स्तरातून कौतूक व अभिनंदन होत आहे. मंडणगड तालुका ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष रघुनाथ पोस्टुरे, कुणबी सेवा संघ महिला आघाडी सेक्रेटरी सुप्रिया चांदीवडे, सामाजिक कार्यकर्ते इरफान बुरोंडकर यांनी भेट घेत तिचे अभिनंदन केले. 

मैदानाअभावी प्रतिभा संधीविना 
मंडणगड तालुक्‍यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रांतील प्रतिभासंपन्न खेळाडू आहेत. मात्र सराव करण्यासाठी सुसज्ज मैदान नसल्याने त्यांच्या सरावाला मर्यादा येतात. प्रतिभा असूनही त्याला वाव मिळत नाही. क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडलेलाच आहे. आजही तालुक्‍यातील क्रीडापट्टू मोकळ्या झालेल्या शेतात आपला सराव करतात. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT