Fish Auction To Be Held In Devgad Tomorrow Sindhudurg Marathi News 
कोकण

देवगडमध्ये उद्यापासून होणार मासळी लिलाव 

सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) - सामाजिक अंतराचे कोटेकोरपणे पालन करून मासळी लिलाव करण्याच्या सुचना कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी येथे दिल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी करण्याचे टाळा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यानुसार उद्या (ता. 20) येथील खाडीकिनारी मासळी लिलाव सुरू होणार आहे. मासळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांना आखणी करून दिलेल्या ठिकाणीच उभे राहण्याची सुचना त्यांनी केली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशावेळी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी येथे मासळी लिलाव करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी मच्छीमार करीत होते. या पार्श्‍वभूमीवर कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कटेकर यांनी येथील मासळी लिलावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन काही सुचना केल्या.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, मच्छीमार नेते भाई खोबरेकर, दिर्बा यांत्रिकी नौका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ कोयंडे, तारामुंबरी मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी प्रतिक महाडवाला, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, तुषार पाळेकर, सायबू भिल्लारे आदी उपस्थित होते. यावेळी कटेकर यांनी, सोशल डिस्टन्सी पाळून सोमवारपासून (ता.20) लिलाव प्रक्रिया सुरू करावी अशी सुचना केली.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT