Fish Auction Started Today In Devgad Sindhudurg Marathi News
Fish Auction Started Today In Devgad Sindhudurg Marathi News 
कोकण

देवगडमध्ये आज सुरु झाले याचे लिलाव 

सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) -  सामाजिक अंतराचे कोटेकोर पालन करीत येथे आजपासून मासळी लिलावास प्रारंभ झाला. यावेळी खबदारी म्हणून लिलावाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आज नौकांची संख्या कमी असल्याने काही ठराविक वेळेत लिलाव आवरला. मासळी खरेदीसाठी व्यापारी तसेच स्थानिक मासळी विक्रेते उपस्थित होते. 

सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या सुचना कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी येथे दिल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी करण्याचे टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. येथील खाडीकिनारी मासळी लिलावाच्या ठिकाणी डॉ. कटेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक मच्छीमारांना काही सुचना केल्या होत्या.

त्यानुसार आजपासून येथील खाडीकिनारी मासळी लिलाव सुरू झाला. सामाजिक अंतराचे पालन करीत व्यवहार सुरू होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आखून दिलेल्या चौकोनात उभे राहून मासळी लिलावाची प्रक्रीया सुरू होती. परस्परांमध्ये सामाजिक अंतर राखले जाताना दिसत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT