fish
fish 
कोकण

अबब! चक्रीवादळांमुळे राज्यातील मत्स्योत्पादन किती टक्क्यांनी घटले.......वाचा...

सकाळ वृत्तसेवा

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात यंदा 2.1 टक्‍क्‍यांची वाढ झाली असली तरी राज्यातील मत्स्योत्पादन मात्र 32 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळांमुळे मासेमारीच्या एकूण दिवसांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालात मांडण्यात आले आहे. असे असले तरी राज्यात यांत्रिकी बोटींच्या बेसुमार मासेमारीमुळेही मासेच कमी होत असल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे. 

देशातील सर्व किनारी राज्यातील मत्स्योत्पादनाचा आढावा सीएमएफआरआयकडून दरवर्षी घेण्यात येतो. त्यानुसार देशात 35 लाख 60 हजार टन मत्स्योत्पादन झाले आहे. राज्यात 2.01 लाख मत्स्योत्पादन आहे. हे प्रमाण देशातील एकूण मत्स्योत्पादनाच्या 5.6 टक्के असून, मत्स्योत्पादनात राज्याचा सातवा क्रमांक आहे. राज्यातील मत्स्योत्पादनात बोंबील तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यात तुलनेने कमी घट झाली आहे. कोळंबीच्या उत्पादनातील घट मर्यादित असली तरी पहिल्या पाच क्रमांकातील सर्वच माशांच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. एकूण उत्पादनात खोल पाण्यातील आणि महासागरी मासे अधिक आहेत.

हे पण वाचा - लाचेची रक्कम घेऊन गेला स्वच्छतागृहात; बाहेर येताच अडकला जाळ्यात

गेल्या वर्षी अरबी समुद्रात सातवेळा चक्रीवादळ पूर्वपरिस्थिती (सायक्‍लोनिक डिस्टर्बन्स) तयार झाली. 1891 ते 2018 या कालावधीच्या तुलनेत हे सर्वाधिक प्रमाण असून, यापूर्वी 1998 मध्ये सहावेळा चक्रीवादळ पूर्वपरिस्थिती झाली होती. या पूर्वपरिस्थितीचे चक्रीवादळात रूपांतर होऊन अरबी समुद्रात तीन चक्रीवादळे तयार झाली. या सर्व काळात मासेमारीचे दिवस घटले. त्यातच गेल्या वर्षी मॉन्सूनचा लांबलेल्या परतीच्या प्रवासामुळे मच्छीमारांना समुद्रात जाता आले नव्हते. पावसाळा संपता-संपता येणाऱ्या मासळीचा उपयोग प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो; मात्र त्यांची आवक घटली. 

राज्य सरकारच्या मत्स्य आयुक्तालयामार्फत मांडली जाणारी आकडेवारी आणि सीएमएफआरआयची आकडेवारी यात बहुतांशवेळा फरक दिसतो. त्यामुळे मत्स्योत्पादन कमी झाले असले तरी राज्याकडून त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात नाहीत. गेल्यावर्षी मोठा फटका बसला आहेच, पण यावर्षी जवळपास अर्धे वर्ष कोरोनामुळे वाया गेले आहे. त्यामुळे शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करावा.' 
- रामदास संधे, अध्यक्ष, राज्य मच्छीमार सहकारी संघ 

गेल्या 45 वर्षांत यांत्रिक बोटींमध्ये चारपट वाढ झाली. परिणामी अवेळी होणाऱ्या मासेमारीचे प्रमाण वाढले. त्याचा फटका मत्स्य साठ्यावर, पुनर्रुत्पादनावर होत आहे. एलईडी, पर्ससीन नेट अशा माध्यमातून होणाऱ्या मासेमारीवर बंदी असली, तरी त्याबाबत कानाडोळा होत आहे. भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसतील.  मिरकरवाडा बंदरात अवैधरीत्या एलईडी लाईटच्या तसेच पर्ससीन जाळीच्या साहाय्याने मासेमारी करून आलेल्या 350 नौकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनही त्यावर कारवाई केली नाही. मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनीही अवैध मासेमारी बंद करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याचे काय झाले? ही मासेमारी बंद का करत नाहीत?
- दामोदर तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT