fisherman dead in sea after 32 years his dead body found in harnai beach ratnagiri 
कोकण

मासळी जाळ्यात आली असेल म्हणून पहाटे पाहायला गेला अन् घडलेल्या घटनेने गावकरीही हळहळले

राधेश लिंगायत

हर्णे (रत्नागिरी) : हर्णे फत्तेगड येथील स्थानिक ग्रामस्थ राजा पद्मा पावसे हे नेहमी मासळी पागायला जातात. मासळीसाठी किनाऱ्याला जाळी लावायची आणि दुसऱ्या दिवशी बोया लावून जाऊन ती जाळी पुन्हा किनाऱ्यावर आणायची आणि त्यात मिळालेली मासळी काढून विकून त्यावर  घर चालवायचं हा पावसे यांचा नेहमीचाच उद्योग होता. यामध्ये ते सगळी मेहनत एकटेच करायचे. कधीतरी त्यांच्या सोबत पत्नी सुद्धा जात असे. 

असेच २ तारखेच्या संध्याकाळी राजा पावसे हे जाळी लावण्यासाठी गेले होते. त्यादिवशी त्यांनी जाळी लावली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ तारखेच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जाळीत थोडीफार मासळी आली असेल या हेतूने किनाऱ्यावरून ते बोया घेऊन गेले होते, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. जाताना जाळीतून काढलेले मासे ठेवण्यासाठी टोपले किनाऱ्यावर काढून ठेवलेले होते. घरांमधील नातेवाईकांना वाटले की लावलेली जाळी आणण्यासाठीच ते गेले आहेत. परंतु बराच वेळ पावसे परत आले नसल्याने शोधशोध सुरू झाली. परंतु पावसे यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, आज सकाळी तब्बल ३२ तासांनी त्यांचा मृतदेह हर्णे येथील समुद्रकिनारी सापडला. मासेमारीसाठी गेलेले मच्छिमार पावसे यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे.    

यासंबधी ग्रामस्थांनी काल सकाळी हर्णे पोलीस स्थानकात राजा पावसे हरवले असल्याची तक्रार दिली होती. ग्रामस्थांनी पूर्ण किनारपट्टीचा शोध घेतला. परंतु काहीही आढळले नाही. आज दुपारी दीडच्या सुमारास पावसे यांचा मृतदेह किनाऱ्यावरजवळ तरंगताना दिसला. तब्बल ३२ तासांनी पावसे यांचा मृतदेह सापडला. तेव्हा ग्रामस्थांनी एकच धावपळ केली. छोट्या बोटीच्या साहाय्याने हा मृतदेह किनाऱ्यावर आणला.

तातडीने रुग्णवाहिकला पाचारण करून  मृतदेह शवविच्छेदनाकरिता दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. सदरच्या घटनेमुळे परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी हर्णे पोलीस दुरक्षेत्राचे बिट अंमलदार मोहन कांबळे, सुशील मोहिते, हर्णेचे तलाठी अमित शिगवण यांनी घटनेचा पंचनामा केला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT