कोकण

आचरा नजीक ट्रॉलर बुडाल्याची घटना

महेश बापर्डेकर

आचरा - मासेमारी करून परतत असताना आचरा पिरावाडी येथील समुद्रातील नस्तानजीक मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक ट्रॉलर बुडाल्याची घटना घडली. या ट्रॉलरवरील सतरा खलाशांना दोरीच्या साह्याने किनार्‍यावर सुखरूप आणण्यात आले.

दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी हा ट्रॉलर किनार्‍यावर आणण्यात यश मिळाले. हडी येथील रियान अझीज शेख यांच्या मालकीचा हा ट्रॉलर असून यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान या ट्रॉलरला ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करण्याचा परवाना असताना त्यांच्याकडून पर्ससीनच्या जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे दिसून आल्याने याची मत्स्यव्यवसाय विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे. 

गेले काही दिवस समुद्रात किमती मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे हडी येथील रियान शेख यांच्या मालकीचा ट्रॉलर गेले दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. मध्यरात्री हा ट्रॉलर मासेमारी करून परतत असताना आचरा पिरावाडी येथील समुद्रात नस्तानजीक सुकतीमुळे कलंडला. ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी व जाळी असल्याने समुद्राचे पाणी आत घुसल्याने तो बुडाला. ट्रॉलरवरील खलाशांनी याची माहिती किनार्‍यावरील सहकार्‍यांना दिली.

त्यानुसार रियान मुजावर, किशोर तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, आसिफ मुजावर, फिरोज मुजावर, बुधाजी पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह पिरावाडी, जामडूल, हिर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी किनार्‍यावर धाव घेतली. यातील काहींनी दोरीच्या साह्याने ट्रॉलरवरील सतरा खलाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मध्यरात्रीपासून हा ट्रॉलर वाचविण्यासाठी मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा ट्रॉलर किनार्‍यावर काढण्यात यश मिळाले. यात ट्रॉलरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अक्षय धेंडे, श्री. फरांदे यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. मत्स्यव्यवसायचे अधिकारी मात्र घटनास्थळी दाखल झालेले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

SCROLL FOR NEXT