five acres of mango and cashew crops farmer agriculture kokan marathi news 
कोकण

कोकणात पाच एकरातील हातातोंडाशी आलेले आंबा व काजूचे पीक आगीत भस्मसात

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील भातगाव गावात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर क्षेत्रावर असलेल्या आंबा, काजूची बाग होरपळून मोठे नुकसान झाले. शुक्रवारी (ता.26) दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी शनिवारी नुकसानग्रस्त क्षेत्र बागायतींचा पंचनामा केला आहे. यात हातातोंडाशी आलेले आंबा व काजूचे पीक या आगीत भस्मसात झाल्याने बागायतदारांना मोठा धक्का बसला आहे. किमान 60 हजाराचे नुकसान झाल्याची पंचनाम्यात नोंद आहे. 


तालुक्‍यातील भातगाव माळरानावर येथील शेतकऱ्यांनी आंबा व काजूच्या बागायती फुलवल्या आहेत. तसेच या परिसरात मोठया प्रमाणात भातशेतीची लागवडही केली जाते. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वीज महावितरण कंपनीच्या वीज खांबावर शॉर्ट सर्किट होऊन बागायतींच्या गवताला आग लागली. कदम यांच्या मालकीच्या बागेत ती सर्वत्र पसरली. यात सुमारे पाच एकर क्षेत्रावरील आंबा, काजू बागायती होरपळून गेल्या. वणव्यात 71 गुंठे बागायतीचे नुकसान झाले आहे, असे कदम यानी सांगितले. पंचनाम्यात 60 हजार नुकसान नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात नुकसान यापेक्षा अधिक आहे.

भातशेतीच्या भाजवळीसाठी आणलेले भारे, चुलीसाठी फोडलेली लाकडे या आगीत जाळून खाक झाली. या आगीत बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांनी केली.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT