कोकण

रत्नागिरीतून पाच डझन आंबा वाशीला रवाना

राजेश कळंबटे

रत्नागिरी - हर्णैपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथील इदायत अब्बास मुजावर यांच्या बागेतील पाच डझन आंब्याची एक पेटी वाशीला रवाना झाली. नोव्हेंबरमध्ये प्रथमच  त्यांच्या बागेत आंबा घेण्यात आला आहे. त्यासाठी बागायतदारांना कोणती मेहनतही घ्यावी लागलेली नाही. हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम लांबणार असला तरीही हर्णै, देवगडसह रत्नागिरी तालुक्यातून मोजकाच आंबा बाजारात जाऊ लागला आहे.

आंबा बागायतदार मुजावर यांच्या कासारवेलीतील बागेत जुलै, ऑगस्ट महिन्यात पाच कलमांना मोहोर आला होता. तो पावसामध्ये गळून जाईल, असे त्यांना वाटले. त्यातून उत्पादन घेण्याच्यादृष्टीने त्यांनीही लक्ष केंद्रीत केले नव्हते. सप्टेंबरमध्ये पडलेल्या कडकडीत उन्हामध्ये मोहोराला कणीएवढी कैरी लागली. ती हळूहळू वाढत होती. नोव्हेंबरमध्ये पाचही झाडावरील आंबे तयार झाले. ते बाजारात नेण्याचा निर्णय घेतला. पाच डझनची पहिली पेटी शनिवारी (ता.10) भरुन तयार ठेवण्यात आली आहे. रविवारी वाशी बाजार बंद असल्याने सोमवारला पोचेल. किमान दहा हजार रुपये तरी पेटीला दर मिळावा, अशी अपेक्षा बागायतदार मुजावर यांनी व्यक्त केली आहे. पुढील दहा ते बारा दिवसांमध्ये अजून तीन ते चार पेटी आंबा पाठविण्यायोग्य होऊ शकतो. सध्या झाडावर दहा ते बारा पेटी आंबा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हंगामापूर्वी वाशीला पाठविलेल्या आंबा पेट्या या किनारपट्टी भागातील कलमांच्या आहेत. या पट्ट्यातील काही कलमे लवकर मोहोरली. त्याचे उत्पादन मिळाले आहे. कासारेवलीतील मुजावर यांच्या बागेतून सात ते आठ वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये आंबा गेला होता; परंतु नोव्हेंबरमध्ये प्रथमच आंबा पाठविला आहे.

चार महिन्यांपूर्वी आमच्या बागेतील पाच झाडांना मोहोर आला होता. त्यातून कैरी फुटलेली आम्ही पाहिली; मात्र त्यातून उत्पादन घेण्यासाठी आम्ही कोणतीच मेहनत घेतली नाही. ऑक्टोबरमध्ये आंबे तयार झाले.

- इदायद अब्बास मुजावर, बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT