five year talathi post empty not working in tulsiwadi chiplun in ratnagiri 
कोकण

पाच वर्षे तलाठीच नाही ; कामाला लागलाय ब्रेक

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : तुळसवडे तलाठी सजाला कायमस्वरूपी तलाठी देण्याच्या गेल्या पाच वर्षाच्या मागणीला महसूल प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्याचा त्रास लोकांना होत आहे. त्यामुळे तुळसवडे ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 1 जानेवारीपर्यंत तुळसवडे सजाला कायमस्वरूपी तलाठी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी सरपंच संजय कपाळे यांनी दिला. 

तुळसवडे सजामध्ये तुळसवडे, सोलीवडे आणि जांभवली या महसूली गावांचा समावेश आहे. या सजाला चार ते पाच वर्षे कायमस्वरूपी तलाठी नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांची गैरसोय होते. या सजाच्या तलाठीपदाचा पदभार यापूर्वी ओझर तलाठ्यांकडे प्रभारी म्हणून दिला होता. त्यांनी काही दिवस काम केले. त्यानंतर धुमाळ यांच्याकडे पदभार दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तलाठी कार्यालयाची चावीही धुमाळ यांच्याकडे आहे. मात्र, ते कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत आणि त्यांनी चावीही जमा केलेली नाही. कायमस्वरूपी तलाठ्यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्याची कोणीही दखल घेतली नसल्याचे श्री. कपाळे यांनी सांगितले. त्यामुळे तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. 

दफ्तरही हलवले 

तुळसवडे गावात तलाठी कार्यालय असूनही या कार्यालयातील दप्तर कोणालाही माहिती न देता सौंदळ मंडळ कार्यालयात हलविण्यात आले आहे. हलविलेल्या ठिकाणातून दफ्तर गहाळ झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल संजय कपाळे यांनी उपस्थित केला.  

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT