Flood To Gad janwali River Achara Road Closed Sindhudurg Marathi News
Flood To Gad janwali River Achara Road Closed Sindhudurg Marathi News  
कोकण

गड, जानवली नदींना पूर; या मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प

सकाळवृत्तसेवा

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - कणकवली शहर आणि तालुक्‍यात आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार सरी कोसळल्या. गड आणि जानवली नदींना पूरस्थिती असल्याने नदीकाठच्या सखल भागात पाणी गेले. यात कणकवली - आचरा आणि कणकवली - सातरल मार्ग दिवसभर ठप्प होता. तर हायवे ठेकेदाराने पाणी निचरा न केल्याने शहरातील प्रांत कार्यालगतच्या कॉम्प्लेक्‍समधील दुकाने आणि घरांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले. 

कणकवली शहरात काही भाग दिवसभर पाण्याखाली होता. तर प्रांत कार्यालयासमोरील गटार बंद झाल्याने रामेश्‍वर प्लाझा संकुलातील तळमजल्यावरील दुकाने, हॉटेल आणि माजी आमदार विजय सावंत यांच्या निवासस्थानात पाण्याचा शिरकाव झाला होता. सुमारे तीन तास पाणी तुंबून राहिल्याने दुकाने आणि घरांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी तीन वाजता हायवे ठेकेदार आणि नगरपंचायत प्रशासनाने जेबीसी यंत्रणा आणून प्रांत कार्यालयासमोरील नाला मोकळा केला. त्यानंतर येथील पाणी ओसरले. 

कणकवली आचरा मार्गावरील वरवडे रस्त्यावर आजही पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तर वागदे येथील कॉजवेवर पाणी असल्याने कणकवली - सातरल - कासरल - असगणी या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. तालुक्‍यातील नाटळ, भिरंवडे, कुंभवडे, जानवली या भागातील ओहोळांवर पाणी असल्याने येथील वाड्यांचा संपर्क दिवसभर तुटलेला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT