कोकण

चिपळूण महापूर : कमी काळात अधिक पाऊस अन् समुद्राला भरती

जलसंपदाचा पुनरुच्चार; गाळ काढण्यासाठी नोडल अधिकारी

सकाळ वृत्तसेवा

जलसंपदाचा पुनरुच्चार; गाळ काढण्यासाठी नोडल अधिकारी

चिपळूण : सह्याद्री खोऱ्यात २२ जुलैला कमी कालावधीत प्रचंड पाऊस झाला. त्यातच समुद्राला भरती आल्याने चिपळुणात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. महापुरातील २ टक्के पाणी हे कोळकेवाडी धरणाचे पाणी आहे, असा दावा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गोगरे यांनी केला. वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्यासाठी १० पोकलेन व ५० टीपर येत्या आठवड्यात चिपळुणात पोहोचतील. गाळ काढल्यानंतर पूररेषेचे अंतर कमी होईल. गाळ काढण्याच्या कामकाजात सुसूत्रता राहावी यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

चिपळूण बचाव समितीतर्फे गेल्या १५ दिवसांपासून साखळी उपोषण चालू आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव विजय गोगरे यांची नियुक्ती करून विविध विभागांशी समन्वय ठेवून गाळ काढण्यास चालना देण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार गोगरे यांनी मंगळवारी चिपळुणात वाशिष्ठी व शिवनदीची पाहणी केली. त्यांनी पंचायत समितीत चिपळूण बचाव समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. समितीने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळाची परिस्थिती कथन केली.

प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. सांगली, कोल्हापूरला वाचवण्यासाठी चिपळूणला बुडवल्याचा आरोपही समिती सदस्यांनी केला. गेल्या ५० वर्षांत नदीतील गाळ काढला नाही. तो न काढताच पूररेषा मारली गेल्याचे निदर्शनास आणले. यावर गोगरे म्हणाले, ‘अतिवृष्टी हेच महापुराचे कारण आहे. कोळकेवाडी धरणातून पाणी सोडले हे खरे आहे, पण महापुरातील एकूण पाण्याच्या ते फक्त २ टक्के आहे.’

पाणी वहनक्षमता ३ लाख क्युसेस हवी

गाळ काढण्यासाठी शासनाचे १० पोकलेन आणि ५० टीपर येत्या ८ दिवसांत चिपळुणात पोहोचतील. या कामी केवळ डिझेलचा खर्च होणार असून, त्यासाठी १० कोटींची तरतूद झाली आहे. नदीतील किमान ३ मीटर खोल गाळ काढला जाईल. गाळ निघाल्यानंतर पूररेषेचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल. वाशिष्ठी नदीचा कॅचमेंट एरिया पाहता किमान ३ लाख क्युसेस पाण्याची वहनक्षमता असणे आवश्यक आहे. नद्यांतील बेटे आणि गाळ काढल्यानंतर वहनक्षमता पाहिली जाईल, असे विजय गोगरे यानी सांगितले.

गाळ मोफत

काढलेला गाळ पालिकेच्या जागेत टाकून त्याचे सपाटीकरण केले जात आहे. शेतीच्या कामासाठी कोणाला गाळ हवा असल्यास तो दिला जाईल. शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयाच्या, क्रीडांगणाच्या जागेत भरावासाठीही गाळ मोफत दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT