The forest department was able to rescue the leopard from the well at Devrukh 
कोकण

देवरुख येथे बिबट्या पडला विहिरीत... मग त्याला वाचवलं असं...

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - देवरुख येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यास वन विभागाला यश आले. काल सायंकाळी साडे सहा वाजता हा प्रकार घडला. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

देवरुख- रत्नागिरी मार्गावरील हॉटेल हिल पॉईंट येथे संदीप चाळके यांच्या विहिरीत काल संध्याकाळी बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. याची खबर संतोष जाधव आणि परिमल चाळके यांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी आर. सी. भवर , परिक्षेत्रवन अधिकारी प्रियांका लगड यांच्या नेतृत्वाखाली देवरुखचे वनपाल सुरेश उपरे , वनरक्षक सागर गोसावी, एन एस गावडे, शर्वरी कदम, संतोष कदम, दिलीप गुरव यांनी स्थानिकांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला विहिरीतुन बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा करून बिबट्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. त्याला त्यानंतर नैसर्गीक अधिवासात सोडण्यात आले.

सदरचा बिबट्या मादी असून तो एक वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले. तो सुरक्षित आहे. त्याची लांबी 1.24 मीटर तर उंची 0.45 मीटर होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वत:च्या भावाचे ७ नगरसेवक फोडायला ठाकरेंनी किती खोके दिले? राज ठाकरेंचं नाव घेत भाजपचा राऊतांना सवाल

Share Market IPO : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! या आठवड्यात येत आहेत 4 नवे IPO; कोणते आणि कधी ते जाणून घ्या!

India vs Malaysia : 4,4,4,4,4,6,6,6 : वैभव सूर्यवंशीचं वादळी अर्धशतक, मलेशियन गोलंदाजांना दिला चोप, पण...

Video : अधिराच्या हट्टासाठी समर हनिमूनला जाणार ? मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षकांना हसू अनावर

Satej Patil Congress : सतेज पाटलांसमोर कोल्हापूर महापालिकेत मोठं आव्हान; काँग्रेस इच्छुकांची लांबलचक यादी पण..., हिंदुत्व प्रचाराचा फॅक्टर

SCROLL FOR NEXT