Former councilor Behind the fast in sindudurg kokan marathi news 
कोकण

माजी नगरसेवकाचा लढा आता आयुक्तपातळीवर...

सकाळ वृत्तसेवा

कणकवली(सिंधुदुर्ग ) : बांधकाम परवानगी मिळण्याबाबत माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी प्रांत कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज मागे घेतले. या बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने कोकण आयुक्तांकडे अपील दाखल आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली. ही विनंती श्री.वाळके यांनी मान्य करून उपोषण मागे घेतले. याबाबतचा लढा आपण आयुक्त पातळीवर लढणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

कणकवली रेल्वे स्थानकासमोरील 30 गुंठे जागेत निवासी आणि वाणिज्य बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव श्री.वाळके यांनी नगरपंचायतीकडे सादर केला होता; मात्र या जागेवर नगरपंचायतीने विश्रामगृह बांधण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे बांधकामाला परवानगी दिली जावू शकत नसल्याचे पत्र नगरपंचायतीने वाळके यांना दिले होते. नगरपंचायतीच्या या ठरावाविरोधात वाळके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपील केले होते. या सुनावणीत जिल्हाधिकार्‍यांनी नगरपंचायतीचा ठराव तहकूब केला. तर तहकूब निर्णयाविरोधात उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी कोकण आयुक्तांकडे अपील केले होते.

आयुक्तांकडे अपील​

या अपीलाची प्रत आपणास मिळावी, अशी मागणी उमेश वाळके यांनी नगरपंचायतीकडे केली होती; मात्र या अपीलाची प्रतही दिली जात नाही आणि बांधकाम परवानगीही देण्यास विलंब केला जात असल्याने श्री.वाळके यांनी प्रांत कार्यालयासमोर 28 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते.कोकण आयुक्त कार्यालयात उपनगराध्यक्ष श्री.गायकवाड यांचे अपील दाखल असल्याचे पत्र काल (ता.4) नगरपंचायतीला प्राप्त झाले. ते पत्र आज नगरपंचायत प्रशासनाने आज वाळके यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. नगरपंचायतीच्या कारभारा विरोधात आयुक्त पातळीवर लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

उच्च न्यायालयाचा निकाल

दरम्यान उच्च न्यायालयाने आम्हा जमीन मालकांच्या बाजूने निकाल दिला आहे. तरीही निव्वळ त्रास देण्यासाठी नगरपंचायतीच्या विद्यमान कार्यकारीणीने आरक्षण मुक्त झालेल्या जागेवर विश्रामगृहाचे आरक्षण टाकले आहे. याविरोधात आयुक्त पातळीवर लढा सुरू ठेवणार असल्याचे श्री. वाळके म्हणाले. दरम्यान रेल्वे स्थानकासमोरील जागा नगरपंचायतीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी आम्ही नगरपंचायतीकडे केली होती; पण नगरपंचायतीने विहित मुदतीत जागा ताब्यात न घेतल्याने तेथे बांधकाम परवानगी मागितली आहे.

नगरपंचायतीला प्रतिज्ञापत्र

याखेरीज मुडेश्‍वर मंदिर परिसरातील मैदानासाठी आरक्षित असलेली जागा नगरपंचायतीने रीतसर भूसंपादन करून ताब्यात घ्यावी. फक्त झाडे, विहिर आणि जमिनीचा मोबदला आम्हाला द्यावा. त्यावरील इमारत आणि मंगल कार्यालय आम्ही नगरपंचायतीला मोफत द्यायला तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र देखील नगरपंचायतीला सादर केलेले असल्याची माहिती श्री.वाळके यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT