कोकण

‘महाआघाडी’ म्हणजे बेबंदशाही; माजी शिक्षणमंत्र्यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग): राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आता शिवशाही सरकार राहिले नसून बेबंदशाही सरकार झालेले आहे, असा आरोप भाजपचे नेते तथा माजी शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार (former education minister adv ashish shelar) यांनी केला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र संतापजनक व चिंताजनक वातावरण दिसले. त्याला सर्वश्री पालकमंत्री जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. अॅड. शेलार यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण(Kudal,Malavan)तालुक्यामध्ये ४०० ऑक्सिमीटर व २५ हजार मास्कच्या वाटपाचा प्रारंभ आज झाला. तालुक्यातील बांव बांबुळी व पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या रिसॉर्टमध्ये वाटप झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. (former-education-minister-adv-ashish-shelar-criticism-on-mahavikas-aghadi-kokan-news)

शेलार म्हणाले, ‘‘आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सुविधा, डॉक्टरांची मोठी समस्या आहे. जिल्हा संकटात असताना पालकमंत्री कुठेही जनतेला मदत करताना दिसले नाहीत. चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय धावता पाहणी दौरा करून लाभार्थ्यांना त्यांनी मदतीचा जाहीर केलेला २५२ कोटीचा आकडा मात्र लाभार्थ्यांची बोळवण करणारा ठरला. भात खरेदीबाबत बोनस देण्यास सरकार विसरले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, अविनाश पराडकर, राकेश कांदे, राजविर पाटील, आदी उपस्थित होते.

आरक्षण देण्यातही अपयश

मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणबाबतही महाविकास आघाडी सरकार काहीच करू शकले नाही. अधिवेशन काळात आपल्याला काहीतरी करता येते; मात्र हे अधिवेशन फक्त दोन दिवसासाठी घेण्याचा निर्णय या सरकारने घेतल्यामुळे हे सरकार राज्यात अपयशी ठरले आहे, असे शेलार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT