Former MP Nilesh Rane tweeted that sanjay rathore has resigned because he is stuck 
कोकण

"संजय राठोड अडकले म्हणूनच राजीनामा दिला"

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मागील काही दिवसांपासून टिक-टॉक स्टार असलेल्या पूजा चव्हाणची आत्महत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या क्लिप्समधील संवाद शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आहेत असा आरोप करण्यात येत आहे. तसेच मागील आठवड्यापासून मंत्री संजय राठोड अनरिचेबल आहेत. या प्रकरणावर आता निलेश राणे यांनी ट्विट करत बोचरी टीका केली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर म्हटलं की, पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड अडकले म्हणूनच त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच SSR आणि दिशा सालियन प्रकरणात देखील आदित्य ठाकरेचं नाव घेण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं.

गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यामुळे यात महाराष्ट्रातील मंत्र्यांचं नाव समोर आल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. पूजाचा मृत्यू नक्की कोणामुळे झाला आता याचा शोध पोलिस घेत आहेत. पूजा चव्हाण हिच्या मृत्यचं गूढ अजून कायम असून गुंतागुंत वाढत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहिण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT