Bhaskar-Jadhav 
कोकण

आता माजी प्रदेशाध्यक्षच राष्ट्रवादीला ठोकणार रामराम!

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इतर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार आणि नेते मंडळींची भरती सुरू आहे. त्यामुळे दररोज कुणीतरी या पक्षातून त्या पक्षात जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष विद्यमान आमदार भास्कर जाधव येत्या दोन दिवसात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुहागर येथे झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा बैठकीत त्यांनी हा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपात जाणार नसल्याचे प्रामुख्याने सांगितले. त्यामुळे जाधव शिवसेनेत जाणार यावर शिक्कामोर्तब झाले. 

जे सोबत येतील त्यांच्या सोबत आणि जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी न ठेवता हा पक्षप्रवेश होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीला कोकणात मोठे खिंडार पडणार हे स्पष्ट झाले आहे. 

भास्कर जाधव यांच्याविषयी 
भास्कर जाधव यांनी 1982 मध्ये शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1995 ते 2004 काळात त्यांनी चिपळूणमधून दोन वेळा आमदार होण्याचा मान मिळविला. छोटी-मोठी पदे भूषविल्यानंतर त्यांनी 2004 ला शिवसेनेतून काढता पाय घेतला. 

अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या जाधवांना 2004 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेत 2009 ला झालेल्या निवडणुकीत सेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांना पराभूत केले. भास्कर जाधव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद आणि आघाडी सरकारमध्ये नऊ खाती सांभाळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरमध्ये भीषण अपघात, दरीत कोसळून बसचा चुराडा; १५ जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

आता 'एटीएम'द्वारे मिळणार धान्य, 'या' जिल्ह्यात सरकारकडून चाचपणी; रेशन दुकाने हद्दपार होणार?

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीला सुरुवात

Ichalkaranji Chandur Violence : सिद्धार्थनगरमध्ये रात्री साडेबारा वाजता थरार! दोन गटांत तुफान हाणामारी, पोलिसांवर दगडफेक

History of Hapus Mango : हापूस नक्की आला कुठून? 'अल्फान्झो' ते 'हापूस' प्रवासाचा रंजक इतिहास; तुम्हाला माहीत आहे का यामागचं सत्य?

SCROLL FOR NEXT