

Jack McGurk
Esakal
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जॅक फ्रेजर मॅकगर्कनं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वनडे कपमध्ये १४ चेंडूत अर्धशतक केलं. तर १२२ धावांची वादळी खेळी केली. यात त्यानं १० चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले. मॅकगर्कने त्याचं शतकही फक्त ४९ चेंडूत झळकावलं. पण त्याला लिस्ट एमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडता आला नाही.