नवी दिल्ली: दिल्लीतील आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) अध्यक्ष नेहा बोरा यांची आज पहाटे सुटका करण्यात आली, तर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. दिल्ली पोलिसांकडून शनिवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. या दोन्ही नेत्यांना शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.