four and half kilo drugs are found by police from youth in chiplun ratnagiri 
कोकण

चिपळूणात 91 हजारांचा साडेचार किलो गांजा जप्त

मुझफ्फर खान

चिपळूण : सावर्डे अडरेकर मोहल्ला येथील एका तरूणाकडे तब्बल 91 हजार रुपयांचा साडेचार किलो गांजा पोलिसांना आढळून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावर्डे पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करत हा गांजा जप्त करून संबंधित तरूणाला ताब्यात घेतले आहे. 

चिपळूण, सावर्डे व अलोरे - शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमलीपदार्थांची बेकायदा विक्री होत असल्याची तक्रार येथील नागरिकांकडून केली जात आहे. सावर्डे हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असल्यामुळे येथे राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तरूण शिक्षणाच्या निमित्ताने येथे येत आहेत. त्यांना अमलीपदार्थांच्या विळख्यात ओढण्याचा प्रकार सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था बंद असल्या तरी अमलीपदार्थांचा धंदा जोरात सुरू आहे.

सावर्डे अडरेकर मोहल्ला येथील गुलाम महामुद काद्री हा तरूण अंमली पदार्थांची बेकायदा आणि विनापरवाना विक्री करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एल. पाटील, पोलिस निरिक्षक हेमंतकुमार शाह आपल्या कर्मचार्‍यांना घेवून आज सकाळी सावर्डे येथे आले. 

काद्री राहत असलेल्या घरावर छापा मारला असता त्याच्याकडे 4, 525 किलो वजनाचा 90 हजार 500 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. अमली पदार्थ बेकायदा बाळगल्याप्रकरणी काद्री याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक चंद्रकांत लाड करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT