Four Hours Electricity To Agricultural Pumps In Ratnagiri  
कोकण

रत्नागिरीत कृषी पंपांना आता सवलतीच्या दरात मिळणार चार तास वीज

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोकणातील अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लागवडीसाठी उद्युक्त करण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत असून, दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेला प्रतिसाद नव्हता; मात्र आता सौरपंपांना वीज पुरवठा करण्यात येणार असल्याने यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेत कृषी पंपाना दिवसा कमीतकमी 4 तास वीज देण्यात येणार असून, सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून लॉकडाउन असताना विविध आर्थिक योजना नियोजित केल्या आहेत. सौर कृषी पंप योजनेद्वारे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यासाठी 33 लाखांचा निधी प्रस्तावित केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी देणे बंद आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेती पंपासाठी कोकणातही लघुदाब वीज वाहिन्यांवरून नवीन वीज जोडण्या देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. आशियाई विकास बॅंकेच्या सहकार्यातून ही योजना लागू करण्यात येणार आहे. सौर कृषी पंप योजना पुढील पाच वर्षांसाठी केली असून, या योजनेद्वारे प्रतिवर्ष एक लाख 5 हजार सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी 670 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

कृषी पंपांना सवलत 
सरासरी वीजपुरवठा दर साडेसहा रुपये असून, कृषी पंपांना एक रुपया 88 पैसे या सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र, यासाठी उद्योगांवर क्रॉस सबसिडी लावून तूट भरण्यात येते. दिवसा मुबलक प्रमाणात वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे सौर वीजनिर्मिती करून कृषिपंपाची विजेची गरज भागविण्यात येणार आहे. पावसाळ्यात ही स्थिती उद्‌भवल्यास शेतकऱ्यांना सौरपंपाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

SCROLL FOR NEXT