four wheeler minor accident in ratnagiri stive in sand of beach bhatye 
कोकण

पर्यटकांचा अतिउत्साह आला अंगलट; चारचाकी गाडी समुद्राकिनारी नेली अन्

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : समुद्र किनाऱ्यावर पाण्यात चारचाकी वाहने नेण्याचा अतिउत्साह पर्यटकांच्या अंगलट आल्याचा प्रकार रत्नागिरी शहराजवळील भाट्ये किनारी घडला. बुधवारी (१७) सकाळी परजिल्ह्यातून आलेल्या या पर्यटकांना गाडी बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मदत घ्यावी लागली. जेसीबीच्या साह्याने वाळूत अडकलेली गाडी काढण्यात आली.

कोरोना कालावधी असला तरीही काही पर्यटक खासगी गाड्या घेऊन कोकणात फिरण्यासाठी येत आहेत. बुधवारी सकाळी फिरण्यासाठी आलेली मुंबईतील एक कुटुंब चारचाकी गाडी घेऊन भाट्ये येथे किनाऱ्यावर गेले. ओहोटीमुळे किनारा मोकळा होता. पर्यटकांनी उत्साहाच्या भरात गाडी पाण्यापर्यंत नेली. वाळूत गाडीची चाके रुतली. चालकाने गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण गाडी सुरू केल्यानंतर चाके आणखी खोलवर रुतली. प्रयत्न करूनही गाडी काढणे शक्‍य न झाल्यामुळे ते पर्यटक हतबल झाले होते. हा प्रकार फेरीवाल्यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणला. भरतीला सुरवात झाल्यामुळे पाणी वाढू लागले. पर्यटकांची गाळण उडाली. अखेर जेसीबी आणून त्या साह्याने ती गाडी पाण्याबाहेर काढली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT