four years child accident in sindhudurg and he dead in accident 
कोकण

दुर्देवी ! आजोबांच्या डोळ्यांसमोरच चार वर्षाच्या नातवावर काळाने घातला घाला

सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग) : टेम्पोच्या धडकेत पादचारी मुलाचा मृत्यू झाला. सोहम समीर मिराशी (वय ४) असे त्याचे नाव आहे. तो नाडण खालची मिराशीवाडी येथील होता. हा अपघात काल सकाळी सव्वाआठच्या सुमारास तालुक्‍यातील वाडा ते मोंड मार्गावरील नाडण खालची मिराशीवाडीजवळ घडला. येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की तालुक्‍यातील नाडण खालची मिराशीवाडी येथील सोहम आणि त्याचे आजोबा वाडा ते मोंड अशा जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या बाजूने मोंडच्या दिशेने जात होते. नाडण सडेवाडी येथील टेम्पोचालक मोंडच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पोची सोहमला धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रक्‍तस्राव सुरू झाला.

जखमी अवस्थेत त्याला नातेवाईकांनी तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तेथे ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक दशरथ चव्हाण तपास करीत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी अपघातग्रस्त ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT