Fraud In Devrukh Onkar Rural Non - Agricultural Credit System
Fraud In Devrukh Onkar Rural Non - Agricultural Credit System  
कोकण

देवरुखातील 'या' पतसंस्थेत कोट्यवधींचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

देवरूख (रत्नागिरी ) : वादग्रस्त ओंकार ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत झालेल्या कोट्यवधींच्या आर्थिक अपहार प्रकरणी 29 आजी - माजी संचालक व कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्वांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मागवून घेण्यात आली आहे. संबंधितांवर दोषारोप पत्रही दाखल करण्यात आले आहे.

संस्थेवर नेमण्यात आलेल्या प्राधिकृत चौकशी अधिकार्‍यांनी या नोटिसा बजावल्या आहेत.  2012 ते 2015 या कालावधीत या पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. संचालकांनी त्याची कबूली देत त्याची जबाबदारी तत्कालीन शाखा व्यवस्थापिकेवर टाकली. संस्थेचे शासकीय लेखापरीक्षण सुरू झाले. मात्र त्याला विलंब होऊ लागल्याने खासगी लेखापरीक्षण करून घेण्यात आले. यामध्ये सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गेली दोन वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

कुणावर काय कारवाई होते याकडे लक्ष                         

संस्थेवर प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून अ‍ॅड. डी. पी. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी केलेल्या चौकशीतही संस्थेत त्याच कालावधीत 1 कोटी 92 लाख 56 हजार 86 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राधिकृत अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत अपहाराचा आकडा कमी झाला असला तरीही त्याची व्याप्ती लक्षात घेऊन याबाबत कुणावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

29 जणांना नोटिसा पाठवल्या

या प्रकरणात प्राधिकृत चौकशी अधिकार्‍यांनी संस्थेचे आजी - माजी संचालक, कर्मचारी अशा 29 जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर दोषारोपपत्रात नावे असलेल्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती सात दिवसांच्या आत सादर करावी, असे आदेश दिले आहेत.

म्हणणे सादर करण्यास मुदत

या विरोधात बचावासाठी संबंधितांना काही म्हणणे, निवेदन सादर करायचे असल्यास ते शुक्रवारी (ता. 6 डिसेंबर) दुपारी 1 वाजता ओंकार पतसंस्था कार्यालयात समक्ष सादर करावयास सांगण्यात आले आहे. असे म्हणणे सादर न केल्यास संबंधितांकडे काही सबळ पुरावे नाहीत, असे समजून दोषारोपपत्र कायम करण्यात येईल. आर्थिक नुकसान रकमेची जबाबदारी निश्‍चित करून ही रक्कम संबंधितांकडूनच वसूल करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चा नियम 72(4), 72(5), 72(6) मधील तरतुदीनुसार आदेश करण्यात येतील, असेही नोटिशीत नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT