fraud in online documentation of scholarship in ratnagiri connection with bangal 
कोकण

शिष्यवृत्तीत पश्‍चिम बंगालचे कनेक्‍शन ; २०० शाळांमधून साडेतेराशे नावे बनावट

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : प्री मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठीच्या ऑनलाईन अर्जात बनावट नावांची नोंद केल्याचा प्रकार उघड झाला. जिल्ह्यातील सुमारे २०० शाळांमधून साडेतेराशे नावे बनावट आहेत. राज्यभरात ही शोध मोहीम सुरू आहेत. याचे कनेक्‍शन पश्‍चिम बंगालमध्ये असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण आणि १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना केंद्र शासनाकडून अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. ऑनलाईन अर्जासाठी शाळास्तरावर लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. 

शाळांनी प्रक्रिया पूर्ण केल्यावर जिल्हा व राज्यस्तरावर त्याची तपासणी होते आणि ती यादी केंद्राकडे पाठवली जाते. विद्यार्थ्यांचे अर्ज लॉगइन करून कागदपत्रे शाळांकडेच ठेवली जातात. या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात ३ हजार १७१ शाळांमधून ९ हजार ४०० फेर अर्ज भरण्यात आले आहेत. त्यातील नव्याने भरलेल्या अर्जांची संख्या ७ हजार २०३ आहे. २०० शाळांतील सुमारे साडेतेराशे नावे बनावट आहेत. 

ती नावे डिफेक्‍ट करण्याचे आदेश उपसंचालकांनी दिले आहेत. या पडताळणीत मागील पाच वर्षांची कागदपत्रेही तपासण्याच्या सूचना दिल्याने सर्वच शाळांची तारांबळ उडाली आहे. शासनाने कागदपत्रे पडताळणी आणि नवीन नोंदणीसाठी शाळा लॉगीनला १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्हास्तरावरील अर्ज पडताळणी २० पर्यंत करावयाची आहे. वाढीव मुदतीचा फायदा घेऊन प्रलंबित सर्व अर्ज विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना उपसंचालकांनी दिल्या आहेत.

दरम्यान, केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी २ लाख ८५ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात साडेनऊ लाख अर्ज प्राप्त झाल्यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्रासह सर्वच राज्यांची नोंदणीकृत विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाकडून जिल्हानिहाय पडताळणी सुरू आहे. त्यासंदर्भात रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा अल्पसंख्याक शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी घेतला.

अर्जात नमूद दूरध्वनी बंदच

शाळांचा लॉगइन आयडी लीक करून हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीतील बहुतांश बनावट नावांची नोंद पश्‍चिम बंगालमधून झाली आहे. संबंधित अर्जातील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क केल्यास ते बंद होते. यावरून ती नावे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ती सर्व नावे शाळा लॉगिनवरून डिफेक्‍ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"शिष्यवृत्तीसाठी केलेल्या नोंदणीची दरवर्षी पडताळणी होते. यंदा केंद्राकडून सर्व राज्याना पुनर्तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार पडताळणी सुरू आहे. यामध्ये काही बनावट नावे आढळली. ती वगळण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत."

- राजेश क्षीरसागर, अल्पसंख्याक शिक्षण उपसंचालक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT