freightage in ratnagiri face a large problem of labour for good and service carries in konkan 
कोकण

चिपळूण, खेडमधील मालवाहतूकदारांच्या अडचणीत मजुरांचा प्रश्‍न कायम

मुझफ्फर खान

चिपळूण : टाळेबंदी शिथिलीकरणाच्या प्रक्रियेला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी मालवाहतूक व्यवसायाचे गाडे अजूनही रुळावर आलेले नाही. गेली दोन महिने केवळ 10 टक्के व्यवसाय चालू आहे. औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसाठी परदेशातून येणारा कच्चा माल बंदरापर्यंत येतो. तेथून ट्रकने कारखान्यांपर्यंत पोहचवला जातो. गाणेखडपोली, लोटे आणि खेर्डी एमआयडीसीत उत्पादन होणारा माल मुंबई, पुणे, कर्नाटक, गोवा येथे ट्रकने पाठवला जातो. 

चिपळूण, खेड, दापोलीतील 450 हून अधिक ट्रक आणि 1 हजारहून अधिक लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात ट्रकने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा वाटा केवळ 15 ते 20 टक्के इतकाच होता. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दोन महिन्यांत ऑगस्टच्या सुरुवातीस मालवाहतुकीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली. तर गेल्या दोन महिन्यांत त्यामध्ये आणखी 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र औद्योगिक उत्पादन बंद असल्यामुळे ट्रक चालक अडचणीत आले आहेत. 

लोटे, गाणेखडपोली आणि खेर्डीतील बहूतांशी कारखान्यांना लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. कच्चा माल उपलब्ध होत नसल्यामुळे कारखानदारांनी आपले उत्पादन थांबवले आहे. काहींनी कामगार कपात केली आहे. पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे मालवाहू वाहनांची मागणी घटली आहे.

"लोटेतून पूर्वी दररोज 40 ते 50 ट्रक भरून देशातील विविध भागात माल पाठवला जायचा. आता दिवसभरात जास्तीत जास्त 10 ट्रक माल भरला जातो. त्यामुळे ट्रक चालक अडचणीत आहेत. अनेकांनी कर्ज घेवून ट्रक घेतले आहेत. हफ्ते न भरण्याची सवलत रद्द झाल्यानंतर वाहतूकदारांच्या अडचणीत भर पडली आहे. यापुढील काळात हा व्यवसाय कसा सावरेल, याबाबत अद्याप कसलीच स्पष्टता नाही." 

- बुवा सावंत, अध्यक्ष चिपळूण, खेड तालुका वाहतूक व्यवसायिक संघ

मजुरांची प्रतीक्षा 

कारखान्यातील माल ट्रकमध्ये भरण्यासाठी तसेच उतरवण्यासाठी युपी, बिहारचे कामगार होते. ते गावी गेल्यापासून मजूरांची अडचण आहे. काही कामगार परतले आहेत. पण लांबचा प्रवास करण्याची कोणाची मानसिकता नाही. त्यामुळे मजुरांचा प्रश्‍न कायम आहे.

- सुनील उतेकर, मालवाहतूकदार लोटे


संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

Explained : ३०८ धावा अन् २ विकेट्स... तरीही प्रतिका रावलला वर्ल्ड कप विजयाचं मेडल का दिलं गेलं नाही? ICC चा नियम काय सांगतो वाचा

Frequent Urine Blockage: वारंवार थांबून थांबून लघवी होते? मग किडनी निकामी होण्यापूर्वी जाणून घ्या ही ‘धक्कादायक कारणं’!

Latest Marathi News Live Update : दिवा प्रभाग समितीतील बेकायदेशीर इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई

Luxury toilet seat : बापरे!!! एका ‘टॉयलेट सीट’ची किंमत तब्बल ८८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त

SCROLL FOR NEXT