कोकण

इंडोनेशियातील 16 भारतीयांची सुटका; गृह मंत्रालयाची कामगिरी

अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे कंपनी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक गोंधळून गेले.

सकाळ डिजिटल टीम

दाभोळ : स्थानिक शिपिंग एजंटच्या (shipping agent) चुकीमुळे इंडोनेशियन पोलिसांनी (indonesia police) तेथे अडकवून ठेवलेल्या १६ भारतीय नागरिकांची सुटका करून त्याना मायदेशी सुखरूप परत आणण्यात गृह मंत्रालयाने मोठी कामगिरी बजावली. दापोली तालुक्यातील मुर्डी येथील आणि सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाशी संलग्न एका संस्थेचे संचालक विनय जोशी यानी यात महत्वाची कामगिरी बजावली. अडकलेल्या १६ जणांमध्ये दापोली शहराशी निगडीत पुणेस्थित सागर ठाकूरही होते.

दापोली शहरातील स्वानंद स्वीट्सचे मालक श्रीकृष्ण पेठे यांचे पुणेस्थित जावई सागर ठाकूर मर्चंट नेव्हीमध्ये मरिन इंजिनिअर आहेत. त्यांचे जहाज इंडोनेशियाच्या जवळ असताना ठाकूर यांना तब्येतीच्या तक्रारीमुळे भारतात पाठवण्यासाठी जहाजातून त्यांना इंडोनेशियात बंदरात उतरवण्यात आलं. तिथून त्यांना विमानतळावर नेताना स्थानिक शिपिंग एजंटच्या चुकीमुळे इंडोनेशियन पोलिसांनी ठाकूर यांच्यासह अन्य १५ जणांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची सर्व कागदपत्रे आणि मोबाईल जप्त केले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे कंपनी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक गोंधळून गेले. त्यात इंडोनेशियन पोलिसांनी त्यांना कुटुंबीयांजवळ संपर्क करू न दिल्याने परिस्थती अजून गुंतागुंतीची झाली होती.

अखेर हा विषय मूळचे दापोली तालुक्यातील मुर्डी येथील आणि सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाशी संलग्न एका संस्थेचे संचालक विनय जोशी यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोचला. गृहमंत्री शहा यांनी हा विषय वैयक्तिक पातळीवरून भारतीय विदेश मंत्रालयात पाठवला आणि मग इंडोनेशियातील भारतीय दूतावासाने वेगवान पावले उचलत प्रकरण सोडवण्याच्या दृष्टीने आपला एक राजनैतिक अधिकारी या भारतीयांसोबत २४ तास तैनात केला. विदेश मंत्र्यांचे सचिव सोहनलाल यांनी दिल्लीतून या प्रकरणाचा रोज पाठपुरावा चालू ठेवल्याने अखेर इंडोनेशियन पोलिसांनी या भारतीयांच्या सुटकेच्या दृष्टीने आवश्यक तपास आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून इंडोनेशिया येथे अडकलेले भारतीय सुखरूप भारतात परतले आणि चिंता आणि अनिश्चिततेच्या वातावरणातून या सर्वांची कुटुंबे बाहेर पडली.

दूतावासांची कार्यक्षमता, दबदबा

सर्व भारतीय सुखरूपपणे भारतात पोचल्यावर भारतीय विदेश मंत्रालयाने इंडोनेशियन सरकारचे आभार मानले आहेत. आधी (कै.) सुषमा स्वराज आणि आता एस. जयशंकर विदेशमंत्री असताना जगभरातल्या भारतीय दूतावासांची कार्यक्षमता आणि दबदबा पहिल्यापेक्षा कित्येक पटींनी वाढल्याचाच हा पुरावा आहे,असे जोशी यानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

SCROLL FOR NEXT