Petrol diesel prices
Petrol diesel prices  sakal media
कोकण

मंडणगड तालुक्यात इंधन तुटवडा

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : केंद्र शासनाच्या विरोधात देशातील पंपमालकांनी पुकारलेल्या एकदिवसीय इंधन खरेदी न करण्याचा आंदोलनामुळे मंडणगड शहरातील पंपावर तीन दिवसापासून इंधन तुटवड्याची समस्या जाणवत आहे. तालुक्यात पेट्रोल व डिझेल तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन तुटवडा वारंवार होत असल्याने वाहनचालकांना महाड, माणगाव, म्हसळा येथे जाऊन इंधन भरावे लागत आहे.

प्रशासन व पंप आस्थापनांनी या समस्यकेडे दुर्लक्ष केले आहे. मे महिन्यात इंधन तुटवडा या समस्येमुळे निर्माण झालेल्या सर्व समस्यांकडे संबंधित दोन्ही घटकांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. शहरातील सर्व पंप शहरापासून दोन किलोमीटर इतक्या लांबीवर असल्याने स्थानिक व बाहेरून आलेल्यांनाही अडचण निर्माण झाली आहे. इंधन तुटवड्यामुळे कॅनमध्ये पेट्रोल साठवून ठेवत साठेबाजी करत चढ्या भावाने पेट्रोल-डिझेल विकण्याचा अनेकांचा कल दिसून आला. नियमातबसत नसतानाही अनेक पंपावर कॅनमध्ये इंधन भरले जात असल्याने दोन दिवसांपूर्वी एका पंपावर निर्माण झालेल्या संघर्षात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. आपत्कालीन परिस्थितीत पंपांनी किती साठा बफर स्टॉक म्हणून ठेवावा, या विषयीचे नियम सध्याअस्पष्ट आहेत.

महसूल विभागाचा कोणताही अंकुश खासगी आस्थापनांवर नाही. याशिवाय एसटी बसेस पंपावरच इंधन भरत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. दोन ते तीन तासांचा नाहक अपव्यय होत आहे. पंपावर मोठ्याच मोठा रांगा ही बाब सध्या कॉमन असून, यामुळे पंपातील कर्मचारी व ग्राहक यामध्ये वारंवार संघर्ष उडत आहे.

अंतर अर्ध्या तासाचे; सीएनजी भरायला ४ तास

मे महिन्याच्या सुट्टीत गावाकडे येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच पावसापूर्वी माहेरी जाऊन येणाऱ्या महिलावर्गाची फार मोठी पंचाईत होत आहे. सीएनजीचा वारंवार तुटवडा जाणवत असून, गाड्यांच्या संख्येमुळे गाड्यांमध्ये सीएनजी भरायला चार ते पाच तासांचा अवधी लागत असल्याने माहेरी, गावाकडे जायला अर्धा तास, सीएनजी भरायला चार तास अशी अवस्था होत आहे. यामध्ये लहान बालके, वयोवृद्ध नागरिक यांना त्रास होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT