IPL 2026 : जसप्रीत, हेझलवूड सारख्या गोलंदाजांची भीती वाटत नाही का? वैभव सूर्यवंशी म्हणाला, मी बॉलरकडे पाहतच नाही...

Vaibhav Sooryavanshi on Batting Against Bumrah & Hazlewood: वैभव सूर्यवंशीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ७८ धावांची वादळी खेळी केली. त्याने जोश हेजलवूडविरुद्धही आक्रमक खेळ केला. याबाबत त्याने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
Vaibhav Sooryavanshi’s Mantra Against Jasprit Bumrah and Josh Hazlewood

Vaibhav Sooryavanshi’s Mantra Against Jasprit Bumrah and Josh Hazlewood

Sakal

Updated on

१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ स्पर्धा गाजवत आहे. आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्सने खेळलेल्या चारही सामन्यात वैभवची कामगिरी अफलातून राहिली आहे. त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात राजस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघांविरुद्ध स्फोटक फलंदाजी केल्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही त्याच्या बॅटची ताकद दाखवली आहे. शुक्रवारी (१० एप्रिल) राजस्थान रॉयल्सने बंगळुरूला ६ विकेट्सने पराभूत केलं आणि त्यांचा विजयी रथ रोखला आहे. या विजयात वैभव सूर्यवंशीचा मोठा वाटा राहिला. त्यामुळे त्याला सामनावीरही घोषित करण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Sooryavanshi’s Mantra Against Jasprit Bumrah and Josh Hazlewood</p></div>
RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com