Ganesh Visarjan Management On 13 Places In Ratnagiri City  
कोकण

रत्नागिरी शहरात 13 ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने गणेशोत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने घरगुती गणेश विसर्जनासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या गार्डनमध्ये असणाऱ्या विहिरी, काही ठिकाणी कृत्रिम तलाव अशा 13 ठिकाणी पालिका विसर्जनाची व्यवस्था करणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने गणेशोत्सवासाठी वेगळी नियमावली तयार केली आहे. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत. 22 ऑगस्टला गणेशाचे आगमन होत आहे, तर 27 तारखेला घरगुती गणपतींचे विसर्जन आहे. शासनाच्या सूचनांनुसार घराजवळच असणाऱ्या तलावात अथवा कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करायचे आहे. त्यासाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी संबंधितांनी घ्यायची आहे.

विसर्जनाची व्यवस्था नागरिकांनी जवळच करायची आहे. नागरिकांची गणेशोत्सवात गैरसाये नको म्हणून पालिकने पुढाकार घेतला आहे. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी याबाबत आत्तापासूनच पावले उचलायला सुरुवात केली आहे. मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत याबाबत आवश्‍यक उपाययोजना करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी उचलली. 

शहरातील पालिकेच्या गार्डनमध्ये असणाऱ्या विहिरी व काही ठिकाणी कृत्रिम तलाव करून गणेश विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. शहरात एकूण 13 ठिकाणी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. जुना माळ नाका येथील कृत्रिम तलाव निर्माण करण्याची जबाबदारी नगरसेवक निमेश नायर यांनी उचलली आहे. 
- बंड्या साळवी, नगराध्यक्ष  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

RCB vs SRH: विराटची भर मैदानात ईशान किशनसोबत थट्टा, हनवटीला धरून गोंजारलं; Video Viral

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

SCROLL FOR NEXT