Ganesha sculpture problem konkan sindhudurg 
कोकण

डोक्यावर कर्जाचा बोजा अन् शासनाचा नवा नियम! वाचा... गणेश मूर्तीकारांच्या व्यथा

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे सावट गणेश मूर्तिकारांवरही दिसून आले. तरीही मूर्ती व्यवसाय सावरण्यासाठी बॅंकेतून लाखो रुपयांची कर्जे घेतलेली असताना केंद्राने गणेश उत्सवासाठी घरगुती दोन फुटांपर्यंतच मूर्ती असावी, असा नियम घातला आहे. त्यातच अनेक मूर्तिकारांनी मागणीप्रमाणे आधीच चार फुटांची गणेशमूर्ती बनवून ठेवल्याने आता मूर्तिकारांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. चार फुटाच्या गणेशमूर्ती ग्राहकांनी न घेतल्यास काय करावे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने परिस्थितीनुसार नियमावली जाहीर केली आहे. कोरोना अद्यापही पूर्ण हद्दपार न झाल्याने जिल्ह्यातील धार्मिक कार्यक्रम, सभा, बैठका, सण-उत्सव यावर शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यातच अवघ्या दीड महिन्यात गणेश चतुर्थी येणार आहे. 

चतुर्थी सणाचा अंदाज घेऊन दरवर्षी एप्रिल, मे आणि जूनपासूनच मूर्तिकामाला सुरुवात करतात. त्यानुसार यंदा अनेक मूर्तिशाळांमध्ये ऑर्डरप्रमाणे मूर्तिकारांनी एक फुटापासून चार फुटांच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. दोन ते चार फुटांच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांना मातीचा साठाही जास्त वापरात आणावा लागतो. मूर्तीवरही विशेष मेहनत घ्यावी लागते. 

यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने जिल्हा तसेच गोवा येथून सर्वांना मातीची आयात न करता आल्याने बऱ्याच मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला. वाहतूक भाड्यामागे 3 ते 4 हजार रुपये तर मूर्तिकामासाठी बनविण्यात येणाऱ्या मातीच्या मजुरीसाठी एक ते दीड हजार रुपये एवढा खर्च आल्याने खिशाला कात्री लागली आहे.

जिल्ह्यातील अनेक मूर्तिशाळांत मूर्तिकारांनी दोन फुटांच्या वर म्हणजेच अडीच, तीन, चार फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. बरेच मूर्तिकार भाड्याने साचे आणतात. हे साचेकाम तत्काळ पूर्ण करावे लागत असल्याने कच्चे मूर्तिकाम आधी करावे लागते. मूर्तिकारांनी कर्ज काढून तसेच आर्थिक तोटा सहन करून मूर्ती बनविल्या असतानाही आता शासनाच्या धोरणामुळे काही मूर्तिकार वेगळ्याच पेचात सापडले आहेत. 

नियमावलीने पेच 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने चतुर्थीत काही नियमावली जाहीर केली आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेशमूर्ती चार फुटांची तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी, असा नियम असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. त्यामुळे आता एवढी मेहनत घेऊन बनविलेल्या दोन फुटापेक्षा मोठ्या चार फुटांच्या मूर्ती ग्राहकांनी न नेल्यास करायचे काय? शासन त्याची भरपाई देणार का? असा प्रश्‍न आहे. गेले कित्येक दिवस ही समस्या मूर्तिकारांना भेडसावत आहे. 

मोठी मेहनत 
निगुडेतील मूर्तिकार गुरुदास गवंडे म्हणाले, ""मूर्तिकार अनेक आर्थिक समस्या व संकटातून मूर्ती व्यवसाय करत असतो. दरवर्षी शासन मूर्तिकारांच्या तोंडाला पाने पुसत आहे. आमदार, लोकप्रतिनिधी फक्त आश्‍वासने देतात. आमच्या मूर्तिशाळेत लोकांच्या मागणीनुसार चार फुटांच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. साधारण 30 मूर्ती या चार फुटांच्या आहेत. त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली आहे.'' 

तोडगा काढावा 
गणेशमूर्ती बनवण्याचा कालावधी सुरू होण्यापूर्वी त्याचे आर्थिक नियोजन करावे लागते. यावेळी मातीचा दर, वाहतुकीचे भाडे, माती बनविण्यासाठी मंजुरी, मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साचे व त्याचे भाडे, रंगकामासाठी लागणारे रंग, कामगारांचा खर्च यातून मूर्तिकाराला फारसे उत्पन्न मिळत नाही. असे असताना आता शासनाच्या या निर्णयामुळे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यातून शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी आहे. 

मूर्तिशाळेत 4 फुटांच्या गणेशमूर्ती आधीच बनविल्या आहेत; मात्र आता शासनाच्या नियमानुसार 2 फुटांच्या मूर्ती घरात पुजण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी मूर्ती न नेल्यास मोठे संकट उभे राहणार आहे. 
- गुरुदास गवंडे, मूर्तिकार तथा निगुडे उपसरपंच 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT