kokan sakal
कोकण

कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध

बाजापेठांत गर्दी; ढोलकी विक्रीसाठी परराज्यातील व्यावसायिक बाजारात

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी: काही दिवसांवर येऊन राहिलेल्या गणेशोत्सवाचे वेध भक्तांना लागले आहेत. त्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी कोकणवासिय व्यस्त झाले आहेत. बाजापेठांत खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. आरती, भजनासाठी वापरली जाणारी ढोलकी विक्रीसाठी परप्रांतीय विक्रेते बाजारात फिरताना दिसत आहेत. ते वाजवत असलेल्या ढोलकीचा आवाज कानावर पडताच गणेशोत्सवाच्या आगमनाची खरीखुरी चाहूल लागत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक व्यवसाय डबागाईला गेले. कडक लॉकडाउन व शासनाच्या नियमावलीमुळे बाजारातील उलाढाल पूर्णपणे थांबली होती. यावर्षी कोरोनाचा धोका काहीशा प्रमाणात कमी झाला आहे. शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. चाकरमान्यांना देखील काही नियमावली घालून कोकणात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या वर्षीची गणेश चतुर्थी दिमाखात होण्याची आशा आहे. त्यांच्या आगमनाची तयारी देखील जोरात चालू आहे.

बाजारात सजावटीचे सामान तसेच आरती, भजन यासाठी लागणारे वाद्य विक्रेते देखील फिरताना दिसत आहेत. खरेदीसाठी नागरिकांकडून चांगला कल असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. शहरात, गावात ढोलकी वाजवत हे विक्रेते घरोघरी फिरत आहेत. घरगुती आरती, भजनासाठी तसेच पारंपरिक गाणी वाजवण्यासाठीही याचा वापर करण्यात येतो. या ढोलक्याची बांधणी खोड, शेळीचे चामडे, चाव्या, पॉलिश, शाई आणि दोरी आदी साहित्य वापरून केली जाते. याची विक्री २५० ते ८०० रुपयांपर्यंत केली जात आहे.

भजनी मंडळांचाही सराव

भजनी मंडळांचा देखील सराव सुरू असल्याचे चित्र गावागावांत दिसत आहे. तबला, पेटीची बांधणी करण्यासाठी कारागिरांकडे गर्दी होत आहे. त्यामुळे यंदा गणरायाचे जंगी स्वागत होणार असल्याचे चित्र आहे. शिवाय कोरोनाचे संकट कमी झाल्याने आनंदाला उधाण येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT