कणकवली : हजारो चाकरमानी दाखल झाल्याने बाजारपेठांतील उलाढाल प्रचंड वाढली आहे. (छायाचित्र : अनिकेत उचले)
कणकवली : हजारो चाकरमानी दाखल झाल्याने बाजारपेठांतील उलाढाल प्रचंड वाढली आहे. (छायाचित्र : अनिकेत उचले) 
कोकण

गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात

सकाळवृत्तसेवा

कणकवली - राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, सिमेंट आणि मातीचा उडणारी धूळ, प्रचंड उकाडा आणि सर्वच रेल्वे गाड्यांना होणारा दोन ते अडीच तासाचा विलंब या विघ्नांवर मात करीत हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. उद्या (ता.13) सायंकाळपर्यंत देखील चाकरमान्यांची गावाकडे येण्याचा ओघ कायम राहणार आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा आणि वाहतूक शाखेने चोख व्यवस्था ठेवली आहे. याखेरीज महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही देखील वेगात सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांचा प्रवास काहीसा सुखकर सुरू आहे. उद्या (ता.13) गणेश चतुर्थी असल्याने आज जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होती.

  • कोकण रेल्वे मार्गावर 282 विशेष फेऱ्या
  • एस.टी.महामंडळाकडून 2225 गाड्यांचे नियोजन
  • एस.टी.मधून लाख तर रेल्वेतून तीन लाख प्रवासी कोकणात दाखल
  • रस्ता मार्गे खासगी बस आणि मोटारीतून 25 हजार चाकरमान्यांचे आगमन

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर 282 विशेष फेऱ्या चालविल्या जात आहेत. याखेरीज उद्या (ता.13) सायंकाळपर्यंत 250 बसेस सिंधुदुर्गात दाखल होणार असल्याची माहिती एस.टी.अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याखेरीज खासगी बसेस आणि शेकडो वाहनांतून चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. 

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज सर्वच बाजारपेठांतील प्रचंड उलाढाल वाढली होती. गणपती सजावटीच्या साहित्याबरोबरच फटाके, शोभेच्या वस्तू, देशी आणि चीनी बनावटीची तोरणे, किराणा दुकाने, कापड दुकाने, तसेच फिरते फळ भाजी विक्रेत्यांकडे मोठी गर्दी होती. जिल्ह्यातील बाजारपेठांत कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होत आहे. यंदा जीएसटीमुळे अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचाही परिणाम विविध वस्तूंच्या खरेदीवर झाल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सव बाजारासाठी ग्रामीण भागातून तालुक्‍याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक दाखल होत असल्याने, सर्वच एस.टी.बसेस सध्या फुल्ल आहेत. याखेरीज तीन आसनी रिक्षा आणि खासगी वाहनांचा व्यवसाय तेजीत आला आहे. प्रमुख मार्गावरील बसेसमध्ये पाय ठेवण्यास जागा नसल्याने जादा एस.टी.बसेस सोडण्याचीही मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

कोकण रेल्वेकडूनही सज्जता
गणेशोत्सवात रेल्वे वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनानेही रेल्वे मार्गावर गस्त वाढविली आहे. तसेच मडगाव आणि रत्नागिरी येथे कंट्रोल रूम उभारला आहे. तसेच सर्वच गाड्यांमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि कणकवली या स्थानकांतून प्रवासी उपलब्धतेनुसार एस.टी.बसेस देखील सोडल्या जात आहेत.

बॅंकांमध्ये गर्दी
गणेशचतुर्थी, चौथा शनिवार आणि रविवार असे जोडून आल्याने सलग तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे आज आर्थिक देवघेवचे व्यवहार करण्यासाठी सर्वच बॅंकांमध्ये मोठी गर्दी होती. यात बॅंकांचे सर्व्हर देखिल धिमे होत असल्याने ग्राहकांना बॅंकामध्ये तासन्‌तास वाट पहावी लागत होती

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT