पवित्र गंगेचे आगमन झाले आहे sakali
कोकण

राजापुरात गंगेचे आगमन

७५ दिवसांनंतर गंगामाईचे आगमन

सकाळ वृत्तसेवा

राजापूर दिवसागणिक हवेतील उष्मा आणि तापमान वाढत असताना रविवारी (ता. २२) शहराजवळील उन्हाळे येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री पवित्र गंगेचे आगमन झाले आहे. ७५ दिवसांनंतर गंगामाईचे आगमन झाले असून, सद्यःस्थितीत मूळ गंगा, काशीकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती गंगा देवस्थानचे पदाधिकारी श्रीकांत घुगरे यांनी दिली.

वास्तव्याचा काळ भाविकांच्या दृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगेच्या वास्तव्याच्या काळात राज्यातील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात: मात्र, कोरोनातील लॉकडाउनमुळे अनेक भाविकांनी गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे साधारण अडीच-तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये गंगेचे निर्गमन झाले होते. ७५ दिवसांनंतर पुन्हा एकदा गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. वाढत्या तापमानाने जगणं असह्य होत असताना गंगामाईचे रविवारी (ता. १५) आगमन झाल्याची माहिती गंगा देवस्थानचे पदाधिकारी घुगरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: इलेक्ट्रिशियनच्या लेकीने भारतासाठी जिंकलं पदक! ज्ञानेश्वरी यादवने गरिबीचा 'भार' झुगारून घडवला इतिहास, तिरंग्यासमोर नतमस्तक

Pune Police: पुण्यात पोलिसांनीच टाकला दरोडा? एक कोटींची कॅश लुबाडण्यासाठी नवले पुलावर केलं कांड; 'असा' झाला भांडाफोड

Latest Marathi News Live Update: बंडखोर खासदारांवरील अपात्रतेच्या याचिकांचा त्वरित निपटारा करण्याची विनंती केली

‘धुरंदर’नंतर ‘एलिना’ची ताडोबातून ज्ञानगंगा अभयारण्यात एन्ट्री, व्याघ्र संवर्धनाला मिळणार आणखी बळ

Ambulance Fare: आता रुग्णवाहिकांमध्ये शासकीय भाडे, रुग्णांची लूट करणाऱ्यांना चाप; कसे असतील नवे दर?

SCROLL FOR NEXT