Ganpatipule Gram Panchayat gave support to the unemployed 
कोकण

गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा आदर्श ; बेरोजगारांना दिला असा आधार...

राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय पर्यटन असलेल्या गणपतीपुळेत लॉकडाऊनचा फटका अनेक स्टॉलधारकांना बसला. हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आणि कुटूंबाचा चरितार्थ कसा चालवायाचा हा प्रश्‍न उभा राहीला. त्यांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत धावली. पावसाळ्यापुर्वीची कामे गावातीलच त्या गरजूंकडे सोपवत ग्रामपंचायतीने रोजगार आणि गावची स्वच्छता असा दुहेरी संगम साधला. सरपंच महेश ठावरे यांनी ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आतापर्यंत 19 ग्रामस्थांना रोजगार दिला आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे.त्यामुळे पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे येथे प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. गणपतीपुळे पर्यटन स्थळ व संपुर्ण गावात अनेक छोटे मोठे दुकानदार, स्टॉलचालक आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाल्यामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले होते. अनेकांच्या कुटूंबांची आर्थिक हेळसांड होत होती. ही बाब लक्षात घेत गणपतीपुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गरजूंच्या हाताला काम देण्याचा निर्णय घेतला. सरपंच महेश ठावरे यांनी ही संकल्पना गावात यशस्वीपणे राबवली.

 अन्याय होणार नाही याची काळजी
पावसाळ्यापुर्वी गावातील वहाळ, नाले यांची साफसफाई करणे, रस्त्यांवर आजुबाजुला असणारी झाडी तोडणे, स्वच्छता करणे, गावातील स्मशानभुमीची स्वच्छता आणि लाकडे भरणे ही कामे केली जातात. त्यासाठी गावातील गरजू कामगारांना पर्याय ठेवला. गणपतीपुळेत सहा छोटे वहाळ आहेत. त्यांचा उगम डोंगरातून होतो. पावसाळ्यापूर्वी ते साफ केले नाहीत, तर दगड-माती वहाळूतन रस्त्यावर येतात. ही कामे त्या कामगारांमार्फत करण्यात आली. या काम वाटपात कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आली.

दिवसाला 500  मजुरी निश्तिच

सुरुवातीला नऊ गरजू लोकांना आठ दिवस काम दिले. त्यानंतर दुस-या फळीत तयार झालेल्या दहा गरजूंना आठ दिवस काम दिले. प्रत्येकाला दिवसाला 500 रुपयांप्रमाणे मजुरी निश्तिच केली होती. एकोणीस दिवस हे काम सुरु होते. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसणार्‍यांना रोजगार देत आगळीवेगळा उपक्रम गणपतीपुळे ग्रामपंचायतीने राबविला. ही कामे करताना सोशल डिस्टंसिंगचीही तेवढीच काळजी त्यांनी घेतली.

खर्च ग्रामनिधीतून देणार

याबाबत गणपतीपुळे सरपंच महेश ठावरे म्हणाले, गावातील गरजूना घराजवळच काम देऊन उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन दिले. ग्रामपंचायतींच्या बैठकीत निर्णय घेऊन त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली. होणारा खर्च ग्रामनिधीतून दिली जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT